पोलिसांना सांगितलं हार्ट अटॅकचं कारण पण पतीच्या मृत्यूची निघाली थरारक कहाणी

पोलसांना मात्र मृतदेहाची अवस्था आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता पत्नीच्या या कहाणीवर संशय आला. 

News Photo   2026 07 04T181643.144

पोलिसांना सांगितलं हार्ट अटॅकचं कारण पण पतिच्या मृत्यूची निघाली थरारक कहाणी

दारूच्या व्यसनाला कंटाळलेल्या पत्नीने (Beed) रागाच्या भरात काळ्या तारेने गळा आवळून पतीची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी तिने मृतदेह रुग्णालयात नेला आणि पतीचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचा खोटा बनाव रचला. मात्र, पोलिसांच्या तपासात संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. बीड जिल्ह्यात ही घटना घडली आहे,ृ.

पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नीनेच तारेने गळा आवळत पतीची हत्या केली. पतीच्या खूनानंतर जणू आपल्याला काही माहितीच नाही असा बनाव तिने रचला. तसेच पोलिसांपासून वाचण्यासाठी तिने पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची खोटी कहाणीही सर्वांना ऐकवली. तथापि पोलिसांना संशय येताच त्यांनी महिलेची सक्तीने चाैकशी केली ज्यात तिने आपला गुन्हा कबूल केला.

Maharashtra Rain Alert : आज वादळी पाऊस; पुणे, अहिल्यानगर, बीडसह या’ जिल्ह्यांना येलो ऑरेंज अलर्ट

सदर घटना ही बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथून समोर येत आहे. मृताची ओळख शरीफ पठाण अशी पटली असून, त्याची पत्नीची ओळख नसरीन पठाण अशी पटली आहे. पती शरीफ नेहमीच दारुच्या नशेत पत्नी नसरीनला घरी येऊन त्रास द्यायचा. स्थानिकांच्या मते, दोन्ही नवरा-बायकोंमध्ये नेहमीच भांडण होत असायची. पतीच्या दारुला कंटाळलेली नसरीन मानसिक तणावातही गेली होती.

घटनेच्या रात्रीही दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं ज्यानंतर पत्नी नसरीनला आपला राग सहन करता आला नाही. तिच्या मनात नवऱ्यासाठी तुडुंब द्वेष भरला होता. अशात त्या भांडणात हा द्वेष एकदाच बाहेर निघाला आणि घरात असलेल्या काळ्या वायरनेच तिने गळा आवळत पतीचा खून केला. पतीच्या हत्येनंतर नसरीन घाबरली आणि तिने स्वत:ला वाचवण्यासाठी पतीच्या हत्येच्या खोटा बनवा रचला. शरीफला हार्ट अटॅक आला आहे असं सांगत तिने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केलं.

पोलसांना मात्र मृतदेहाची अवस्था आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता पत्नीच्या या कहाणीवर संशय आला.  यानंतर सक्तीने चौकशी केल्यानंतर नसरीन पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. दुसरीकडं मृत्यूचं खरे कारण शोधून काढण्यासाठी मृतदेहाला शवविच्छेदनासाठीही पाठवण्यात आलं होतं. याच्या अहवालातही मृत्यूचे कारण गळा आवळल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान या प्रकरणात शरीफ यांच्या मुलाच्या तक्रारीवरुन आई नसरीनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version