हिंदू दहशतवादी असेल तर त्याला कौतुक करून सोडून देणं चुकीचं, हुसेन दलवाई यांचं वक्तव्य चर्चेत

जर एखादा हिंदू दहशतवादी असेल, तर त्याच कौतुक करून त्याचा वाचवण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत धोकादायक आणि चुकीची प्रवृत्ती आहे.

Untitled Design 44

Untitled Design 44

Hussain Dalwai’s statement is under discussion : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी दहशतवाद, धर्म आणि सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना वादग्रस्त पण ठळक भूमिका मांडली आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे. दलवाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, दहशतवाद हा कोणत्याही एका धर्माशी जोडून पाहणे अत्यंत चुकीचे आहे. दहशतवाद्यांना धर्म नसतो. हिंदू देखील दहशतवाडु असू शकतो. त्यामुळे आरोपी कोणत्या धर्माचा आहे हे पाहण्याऐवजी त्याने केलेल्या कृत्याच्या आधारेच त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी पुढे असे देखील नमूद केले की, जर एखादा हिंदू दहशतवादी असेल, तर त्याच कौतुक करून त्याचा वाचवण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत धोकादायक आणि चुकीची प्रवृत्ती आहे.

याचवेळी त्यांनी आरएसएसवर देखील जोरदार टीका केली. एका कार्यक्रमाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, त्या मंचावर मोहन भागवत आणि राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असताना वाघेश्वर बाबांनी केलेल्या विधानांना कोणीही आळा घातला नाही. मोहन भागवत यांनी त्याच वेळी बकवास बंद करा असे सांगायला हवे होते, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

इतिहासाच्या मुद्द्यावर बोलताना दलवाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या संबंधाबाबत देखील आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची कधीच भबत झाली नाही. तरी देखील जाणूनबुजून चुकीचा इतिहास पुढे रेटला जात आहे, असे ते म्हणाले. या मुद्द्यावरून देखील त्यांनी विचारधारात्मक राजकारणावर निशाणा साधला.

आम आदमी पक्षाला का सोडलं?…, खासदार राघव चड्ढांनी सांगितले ‘तीन’ मुद्दे

दलवाई यांनी सध्याच्या सत्ताधारी पक्षावर टीका करताना असे देखील म्हटले की, आरएसएसची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात बाबागिरी वाढली आहे. अनेकजण स्वतःला बाबा म्हणवून मिरवत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. त्यांच्या मते, अशा प्रवृत्तीमुळे समाजात अंधश्रद्धा आणि चुकीच्या गोष्टींना खतपाणी मिळत आहे. तसेच, त्यांनी मालेगाव येथील प्रकरणाचा उल्लेख करत भाजपवर आरोप केला की, मालेगावमधील आरोपींना सोडवण्यासाठी भाजपने प्रयात्न केले. या आरोपामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

एकूणच, दहशतवादाच्या प्रश्नावर धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश देताना, दलवाई यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विचारधारात्मक संस्थांवर कठोर टीका केली आहे. त्यांच्या या विधानांनंतर आता भाजप आणि इतर पक्षांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version