Download App

मलाही लव्ह लेटर आलंय, आमदार रोहित पवारांनी सांगूनच टाकलं…

Rohit Pawar : मलाही लव्ह लेटर आलं असल्याचं राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आमदार रोहित पवार थेट भाजपवर हल्लाबोल करीत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन तुमच्यामागे ईडी लागली नाही का? असा सवाल रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर रोहित पवारांनी थेट भाष्य केलं आहे.

रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार

रोहित पवार म्हणाले, मला जे लव्ह लेटर आले आहेत, त्याला आम्ही उत्तर देत आहोत. पुढील काळात अशा विविध संस्थांच्या माध्यमातून आणखी लव्ह लेटर येणारच आहेत, त्यालाही आम्ही उत्तर देणारच. काळजी करु नका माझं वय आत्ता 38 आहे, पुढील बराच काळ राजकारण करायचं असून माझी भूमिका मी बदलणार नसल्याची ग्वाहीच रोहित पवार यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीत फूट नाही, अजितदादा आमचेच नेते; ‘इंडिया’च्या बैठकीआधीच सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

तसेच मी राजकारणात केवळ पद घेण्यासाठी आलो नसून एक विचारसरणीने आलो आहे. मराठी माणूस हा संघर्षांची तयारी मनात ठेवतो, संघर्ष करण्यासाठी नेहमीच तयार असतो, असंही रोहित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदावरही थेटपणे भाष्य केलं आहे. ते म्हणाले, पद, कोणाचा वारसदार हे कोणी व्यक्ती ठरवत नसते. काळ आणि लोकं हे ठरवत असल्याचं रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Mika Singh Health: मिका सिंहची तब्येत बिघडली, कोट्यावधींचे नुकसान

दरम्यान, सध्या आपल्या लोकांसोबत राहणे हेच महत्त्वाचं असून मी शरद पवार यांच्यासोबत असून माझ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील लाखो करोडो तरुण त्यांच्यासमवेत आहेत, हेच मला महाराष्ट्राला सांगायचंय, असंही ते म्हणाले आहेत.

Nargis Fakhri: तलुबाज कास्टमध्ये इसाबेलच्या भूमिकेत दिसणार नर्गिस फाखरी !

राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर पक्षाच्या उभारणीसाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. शरद पवार राष्ट्रवादीच्या पुर्नबांधणीसाठी राज्यभर करीत आहेत. छत्रपती संभाजीनगरनंतर राष्ट्रवादीची पहिलीच स्वाभिमान सभा बीडमध्ये पार पडली. या सभेतून शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षासह अजित पवार गटावर टीकेची तोफ डागली होती.

बीडच्या स्वाभिमान सभेनंतर आता शरद पवार यांची तोफ उद्या कोल्हापुरात धडकणार आहे. 25 आणि 26 ऑगस्ट रोजी शरद पवार हे कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. शरद पवारांच्या आधीच आमदार रोहित पवार कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. रोहित पवारांनी कोल्हापुर दौऱ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर मुश्रीफ यांनीही पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आता उद्याच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांवर काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us