राष्ट्रवादीत फूट नाही, अजितदादा आमचेच नेते; ‘इंडिया’च्या बैठकीआधीच सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीत फूट नाही, अजितदादा आमचेच नेते; ‘इंडिया’च्या बैठकीआधीच सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

Supriya Sule On Ajit Pawar : देशातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची बैठक येत्या 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. त्या बैठकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार(Ajit Pawar) आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतल्यामुळे त्यांची तक्रार आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे केली असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सागितले.

‘भाजप नेत्या सना खान यांची हत्या करणाऱ्या अमित साहुला मी..,’ काँग्रेस आमदाराचा खुलासा…

खासदार सुळेंनी सांगितले की, आमचा पक्ष एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सत्तेत आहे, तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहात आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक झाली. ही गुप्त भेट असल्याचे बोललं गेलं. त्यावर आम्ही गुप्त बैठक करत नाही. चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक का होईल? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

सौदी अरेबियासह 6 राष्ट्रांचा BRICS मध्ये समावेश, विस्तारासोबत ‘हे’ नामकरणही झालं

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे भाजपच्या ऑपरेशन लोटसबद्दल बोलल्या आहेत. त्यांनी सांगितले की, भाजपने तीनवेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुळे यांनी केला. अनेकदा राष्ट्रवादीला फोडण्याचे प्रयत्न झाले. मात्र त्यांना अपयश आलं. यावेळी मात्र भाजपला ते शक्य झालं. त्यांना काहीही करुन सत्तेत यायचं आहे. साम दाम दंड भेद असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार यांचं पक्षातील सध्याचं स्टेटस काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर सुळे म्हणाल्या की, अजित पवार आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. आता त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतलेली आहे. त्याची तक्रार आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिलेली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहात असल्याचेही यावेळी सुळे म्हणाल्या.

त्याचबरोबर आमच्या पक्षाची भाजपशी कुठलीही युती किंवा आघाडी नाही. आमच्यापैकी काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला. त्यावर आम्ही आमचं म्हणणं विधानसभा अध्यक्षांकडे मांडलेलं आहे.

अजितदादांनी लोकशाहीत एक नागरिक म्हणून त्यांचा निर्णय घेतलेला आहे. अजितदादा परत येतील की नाही हे आपण सांगू शकत नाही. पवार कुटूंब एकत्र ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु. कुटुंबामध्ये राजकारण येणार नाही, याची काळजी घेऊ असा शब्दही यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube