Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) आयोजित शांतता रॅलीमध्ये बोलताना राज्य सरकारचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लाबोल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना इशारा दिला आहे.
या रॅलीमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला राजकारणात जायचं नाही. आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं आहे. तुम्ही आरक्षण द्या, माझा तुमच्या राजकारणाशी काहीच घेणंदेणं नाही. मी येडा आहे. आरक्षण घेणारच. भुजबळ पायावर चालत असेल मात्र मी डोक्यावर चालतो असं म्हणत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लबोल केला. तसेच छगन भुजबळ म्हणतात मी चौथी नापास आहे मात्र समोर या तुम्हाला दाखवतो. असे आव्हान देखील त्यांनी वेळी भुजबळ यांना दिले.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, नेहमी मी थांबून निर्णय घेत असतो, मी सर्व दिमागाने खेळत असतो, प्रत्येक वेळी ताकदीचा वापर करायचा नाही. बुद्धीचाही वापर करायचा असतो. फडणवीस, शिंदे, अजितदादा आणि महाजन यांनाही आपण डावात हरवलं आहोत. ही सोपी गोष्ट नाही. आता भुजबळ काहीही बडबडताय. माझ्यामुळे भुजबळांना गोळ्या सुरु झाले. आपल्या डावामुळे प्रत्येक वेळी सरकार फसलं. त्यांनी आपल्याला फसवण्याचं काम केलं. त्यांना मी जे वाटलो होते तसा मी नाही हे आता त्यांच्या लक्षात आलं आहे. असं यावेळी पाटील म्हणाले.
फडणवीस साहेब शिंदे साहेब आरक्षण द्या, नाहीतर आम्ही मुंबईला येऊ आणि त्यावेळी तुमची बंदूक फंदूक काहीच करणार नाही. ही गर्दी फक्त संभाजीनगराची आहे. जर राज्यातील मराठ्यांची लाट निघाली ना तर चालायला मोठी जागा लागेल. सरकारच्या हाती आजची रात्र आहे. सरकारने आमचा अंत पाहू नका असेही जरांगे पाटील म्हणाले.
सरकारकडे आजची रात्र, गांभीर्याने विचार करा, नाहीतर …, जरांगे पाटलांचा सरकारला शेवटचा इशारा
20 जुलैपासून उपोषण करणार
तर मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा 20 जुलैपासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा देखील त्यांनी वेळी केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे आणि आरक्षणासाठी मुंबईला कधी जायचं याचा निर्णय देखील 20 जुलै घेणार असेही या शांतात रॅलीमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.