उद्याच आयुक्त कार्यालयात हजर व्हा, पुणे पोलिसांनी धाडली पूजा खेडकरांना नोटीस…

पुणे पोलिसांनीआता पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांनी नोटीस बजावली. खेडकर यांचा पुणे पोलीस उद्या (दि. 18 जुलै) जबाब नोंदवणार आहेत.

Pooja Khekdkar News

Pooja Khekdkar News

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडक (Pooja Khedkar) यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Divse) यांच्या विरोधात वाशिम पोलिसांमध्ये (Washim Police) छळाची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी (Pune Police) आता पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांनी नोटीस बजावली. खेडकर यांचा पुणे पोलीस उद्या (दि. 18 जुलै) जबाब नोंदवणार आहेत.

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार पहिले दोन्ही हप्ते, अजित पवारांची मोठी घोषणा 

पुजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशीम पोलिसांकडे दाखल केली होती. त्यानंतर खेडकर यांची तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. तक्रार दाखल होताच पुणे पोलिसांनी पुजा खेडकर यांचा नव्याने जबाब नोंदवायच ठरवलं आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी खेडकर यांना नोटीस बजावली आहे. पुणे पोलीसांची नोटीस घेऊन वाशीम पोलिस दलातील महिला अधिकारी पुजा खेडकरांकडे वाशीमच्या विश्राम गृहावर पोहचल्या आहे. उद्या पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे पुणे पोलिसांचे खेडकरांना आदेश आहेत.

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार पहिले दोन्ही हप्ते, अजित पवारांची मोठी घोषणा 

पुणे पोलिस दलातील महिला अधिकारी पुजा खेडकर यांचा जबाब नोंदवणार आहेत. त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीबाबत काय करायचं, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

IAS पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई…
दुसरीकडे खेडकर यांच्यावर मसुरीच्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांचा पुढील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम थांबविण्यात आला असून त्यांना अकादमीमध्ये परत बोलावून घेतले आहे. यानंतर राज्य शासनानेही त्यांची तात्काळ जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्तता केली आहे.

खेडकर या सध्या वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाचा पुढचा टप्पा अकोला येथे पार पडणार होता. 15 जुलैपर्यंत त्यांना अकोला येथे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. इथे 19 जुलैपर्यंत आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत त्यांचे प्रशिक्षण चालणार होते. पण आता खेडकर यांचा संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमच थांबविण्यात आला आहे.

Exit mobile version