IAS Saurabh Katiyar : MPSC च्या सचिवपदी IAS सौरभ कटियार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IAS Saurabh Katiyar : एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात एमपीएससी

IAS Saurabh Katiyar

IAS Saurabh Katiyar

IAS Saurabh Katiyar : एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात एमपीएससी विद्यार्थी तब्बल अकरा दिवस आंदोलन करत होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांची देखील बदली करण्यात आली आहे. तर पेपरफुटी प्रकरणात चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाच्या सचिवपदी अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता या प्रकरणात राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार (IAS Saurabh Katiyar) यांच्याकडे एमपीएससीच्या (MPSC) सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सौरभ कटियार यांनी यापूर्वी देखील या पदाचे अतिरिक्त कामकाज पाहिले आहे.

तर दुसरीकडे राज्य सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाचा अंतिम अहवाल येईपर्यंत एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) सक्तीच्या रजेवर असणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा कारभार आयोगातील विद्यामान सदस्यांपैकी कुणाकडे दिला जाणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. चौकशी आयोगाला या प्रकरणात अंतिम अहवाल देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

अनधिकृत सदनिकांच्या नोंदणीला आळा; घरखरेदीदारांच्या हितासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय-

सध्या आयोगामध्ये अभय वाघ, सतीश देशपांडे, राजीव निवतकर, दिलीप पाटील- भुजबळ आणि सतीश वाघोले हे सदस्य आहे. यापूर्वी काही दिवसांसाठी प्रभारी अध्यक्ष म्हणून वाघ यांनी काम पाहिले आहे मात्र त्यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांच्या अध्यक्षपद जाण्याची शक्यता खूप कमी असल्याने अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version