Download App

IAS तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली; सत्तारांच्या मंत्रालयातून एका महिन्यात उचलबांगडी

राज्य सरकारने शुक्रवारी 20 भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या केल्या. यात महिन्याभरापूर्वीच पोस्टिंग मिळालेले अधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात कृषी आणि पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून मुंडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यांनी पदभारच स्वीकारला नव्हता. आता तेथून पुन्हा महिन्याभरात त्यांची बदली झाली आहे. मुंडे यांची बदली आता मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (IAS Tukaram Munde Transfer with in one month)

गेल्या 16 वर्षांत त्यांच्या 21 बदल्या झाल्या आहेत. गतवेळी त्यांची बदली झाली तेव्हा त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. बदली होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे आरोग्य संचालक म्हणून जबाबदारी दिली होती. पण याठिकाणी देखील कामाच्या हजेरी आणि नोकरीच्या ठिकाणी निवास या दोन मुद्यावरून डॉक्टर संघटनेशी वाद झाले. त्याचबरोबर राज्यातील आरोग्य केंद्रावर धाडी टाकण्याचा निर्णय खुद्द आरोग्यमंत्री तानाजी सावंत याना मान्य झाला नाही.

डिसेंबर 2022 मध्ये सावंत यांनी स्वतः मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून मुंडे यांची बदली करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये त्यांची आरोग्य संचालक म्हणून उचलबांगडी करण्यात आली. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मुंडे काहीसे विजनवासात गेले होते. मात्र गत महिन्यात त्यांचा वनवास संपवून त्यांच्याकडे कृषी आणि पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून जबाबदारी दिली होती. पण आता तिथूनही अवघ्या एका महिन्यात मुंडेंची बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि बदलीचे ठिकाण :

1. श्रीमती सुजाता सौनिक, IAS (1987) – अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई
2. श्री S.V.R.Srinivas, IAS (1991) विशेष कार्य अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई
3. श्री लोकेश चंद्र, IAS (1993)  मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, मर्यादित, मुंबई
4. श्रीमती राधिका रस्तोगी, IAS (1995) PS आणि विकास आयुक्त, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
5. श्रीमती I.A.कुंदन, IAS (1996) PS, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
6. श्री संजीव जयस्वाल, IAS (1996) उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा, मुंबई
7. श्री आशीष शर्मा, IAS (1997) PS(2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
8. श्री विजय सिंघल, IAS (1997) जनरल मॅनेजर, बेस्ट, मुंबई
9. श्रीमती अंशु सिन्हा, IAS (1999) सचिव, इतर मागासवर्गीय, बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
10. श्री अनुप कृ. यादव, IAS (2002) सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
11. श्री तुकाराम मुंढे, IAS (2005) मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
12. डॉ. अमित सैनी, IAS (2007) – मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई
13. श्री चंद्रकांत पुलकुंडवार, IAS (2008) – साखर आयुक्त, पुणे
14. डॉ. माणिक गुरसाल, IAS (2009), CEO, Mah.Maritime Board, मुंबई
15. श्रीमती कादंबरी बलकवडे, IAS (2010) DG, MEDA, पुणे
16. श्री प्रदिपकुमार डांगे, IAS (2011) संचालक, रेशीम, नागपूर
17. श्री शंतनू गोयल, IAS (2012) सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई
18. श्री पृथ्वीराज बी.पी., IAS (2014) संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई
19. डॉ. हेमंत वसेकर, IAS (2015) आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे
20. डॉ. सुधाकर शिंदे, IRS (1997) यांची अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महापालिका, मुंबई

Tags

follow us