Download App

देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केलं नसतं तर… मुख्यमंत्री शिंदेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मुंबई : 2017 साली मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केलं त्यानंतर शिवसेनेला महापौर पद मिळालं होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला. 2017 साली महापौरपदाच्या निवडणुकीत जे घडलं त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी रंगवून सांगितलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीकाही केली आहे.

धंंगेकरांचा भाजपला इशारा.. म्हणाले, राहुल गांधींवरील कारवाई म्हणजे लोकशाहीची..

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 2017 साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपदासाठी भाजपचे करेक्ट कार्यक्रम केला होता. त्यावेळी मी देवेंद्र फडणवीसांना फोन करुन सांगितलं की, आपण युतीत आहोत. नाहीतर सर्वांनाच माहिती आहे मुंबई महापालिका कोणासाठी काय आहे ते? असा सवाल उपस्थित करत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महापौरपदासाठी मदत करा, त्यावेळी फडणवीसांच्या सहकार्यानेच शिवसेनेला महापालिकेचं महापौरपद मिळालं होतं, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यावेळी विनाशर्त फडणवीसांनी पाठिंबा दिला होता. या सहकार्याची परतफेड 2019 साली पाठीत खंजीर खूपसुन दिल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. एवढं सगळं करुनही यांना त्याची जाणीव नसल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.

राज ठाकरेंचा आज पुणे दौरा, अनधिकृत मशिदीबद्दल बोलणार?

याबाबत देवेंद्र फडणवीसांनी कधीच त्याचा उल्लेख केला नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे, या सर्व घटनांचा मी साक्षीदार असल्याचंही ते म्हणाले आहेत. यासोबतच ठाणे महापालिकेवरील भगवा उतरु नये, म्हणून 2012 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही फोन केला होता. त्याहीवेळेस मदत केली. ठाणे महापालिकेवरील भगवा उतरु दिला नाही.

इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर गौतमी पाटील

दरम्यान, ज्यावेळी असे प्रसंग येतात त्यावेळी जे काही करायचं ते आम्ही करतो आणि केल्यानंतर सांगतही नाही. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो, त्यांनी मदत केली म्हणूनच तेव्हा मुंबई महापालिकेच महापौरपद मिळालं होतं.

Tags

follow us