नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (swarkar) देशासाठी मोठा त्याग केला आहे. जर सावरकर हे स्वातंत्र्यवीर नसतील आणि त्यांनी देशासाठी कुठलाही त्याग केला नसेल तर कुणीही या देशासाठी त्याग केला नाही. इतका मोठा त्याग त्यांनी आपल्या मातृभुमीसाठी केला आहे. मात्र, त्यांची कायम चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. 1947 नंतर जे राज्यकर्ते सत्तेत आली, त्यांनी सावरकर आणि हिंदुत्वाविषयी गैरसमज पसरवले. राहुल गांधी यांचे आभार. असेच काम त्यांनी करावे. मरता क्या न करता, अंधेरी रात मै दिया मेरे हात में असे राहुल गांधी यांचे झाले आहे. डुबाओ रे पार्टी ही मोहीम सुरू रहावी, अशा शब्दात गडकरांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.
नितीन गडकरी हे आम्ही सावरकर या नागपुरात झालेल्या सभेत बोलत होते. त्यावेळी भापजचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या सभेला संबोधित करतांना सावरकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग हा मौलिक होता. त्यांचे समर्पण, त्याग आणि देशभक्ती ही सर्वाच्च होती. मात्र, त्यांच्यावर कायम अन्याय झाला आहे. 1947 नंतर जे राज्यकर्ते आले त्यांनी सावरकर आणि हिंदुत्वाविषयी अनेक गैरसमज रुजवले, अशी टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, सावकरांनी स्वातंत्र्य लढ्यात तरुणांचे स्फुलिंग जागृत केलं. समाजातील भेदाभेद दूर व्हावा, यासाठी ते झटले. मात्र, त्यांची कायम उपेक्षा झाली. मात्र, आज सावरकर हे देशभक्त नसतील, तर देशात कुणीच देशभक्त नाही. आज आपण ज्या चौकात उपस्थित आहोत, त्या चौकातील सावकरांच्या पुतळ्याचं अवावरण बाळासाहेब देवरस, आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झालं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनात त्यांची प्रतिभा, त्याचं साहित्य, त्यांचा त्याग याला फार महत्व होतं. सावकरांनी जर देशासाठी त्याग केला नसेल, तर कुणीच या देशासाठी त्याग केला नाही.
Crime : अहमदनगरमध्ये मोठा राडा! दोन गट भिडले…
मी आठवीत शिकत असतांना मी माझी जन्मठेप हे पुस्तक वाचलं होतं. हे पुस्तक वाचतांना डोळ्यात पाणी येतं. अंदमानच्या जेलमध्ये असतांना त्यांना किती यातना दिल्या असतील, याची कल्पना केली जात नाही. मात्र, आज सावकरांवर टीका केली जातेय. मात्र, सावरकर हे आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. कारण स्वातंत्र्याचा इतिहास रक्ताच्या थोराळ्यात लिहिल्या गेला. आज आपण स्वतंत्र आहोत, हे अनेक स्वातंत्र्यावीरांमुळं शक्य झालं. स्वातंत्र्य मिळवण्यात मतभिन्नता होती. अनेक क्रांतीकारकांना असं वाटलं की, स्वातत्र्य मिळवण्यासाठी इग्रजांशी सशस्त्र लढा दिला पाहिजे. त्यात सावरकर, टिळक, सुभाषबाबू, भगतसिंग होते. तर महात्मा गांधींना शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य हवं होतं. या सगळ्यांच्या विचारात किंवा त्यांच्याच मार्गाबद्दल भिन्नता असू शकते. मात्र, उद्दिष्टांबद्दल मतभिन्नता असू शकत नाही.
तत्कालीन समाजात अनेक रूढी, जातीवाद होता. मात्र, माणूस जातीने मोठा नसतो, तो विचारांनी आणि गुणांनी मोठा असतो, हे सावकरांनी सांगितलं. सामाजिक रुढी, प्रथा याला त्यांनी कायम विरोधक केला. , सावरकराचं हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे आणि हिदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. सावरकर हे कधी कुठल्या धर्माविरोधात नव्हते. धर्माचा उल्लेख कर्तव्याशी आहे. हिंदुत्व हे वे ऑफ लाईफ आहे. व्यक्ती कधी धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. राज्य धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. सरकार धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. नेहरू, इंदिरा गांधीच्या निधनांतर ब्राम्हण बोलावले होते. तुम्ही धर्मनिरपेक्ष होते तर ब्राम्हणांना कशाला बोलावलं? असा सवाल त्यांनी केला.
सावरकर विज्ञानवादी होते, ते रूढी-परंपराच्या विरुध होते. त्यांचं हिंदुत्व हे पुरोगामी हिंदुत्व होतं. इतिहास माहित नसतांना सावरकरांविषयी अपशब्द वापरणं हे दुर्दैवी आहे. मात्र, सावकरांच्या विचारातील हिंदुत्व हेत देशाच्या भविष्याचे प्रतिक आहे, असंही गडकरी म्हणाले.