Download App

…तर टोल टॅक्स वसूल करणं एकदम चुकीचं आहे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

खराब रस्त्यांबद्दल चिंत व्यक्त करत गडकरींनी टोल नाक्याबद्दलही भाष्य केलं. 'जर चांगले रस्ते नसतील तर टोल वसूल करणं चुकीचं आहे अस ते म्हणाले.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Nitin Gadkari On Toll : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खराब रस्त्यांबद्दल चिंत व्यक्त करत टोल नाक्याबद्दलही भाष्य केलं आहे. (Nitin Gadkari)  ‘जर चांगले रस्ते आणि सेवा दिली जात नसेल तर टोल टॅक्स वसूल करणे चुकीचं आहे. () ‘ खराब रस्त्यांवर देखील प्रवाशांना टोल भरावा लागतो. यावरून प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतं. (Toll) त्यावर गडकरी यांनी वरील भाष्य केलं आहे.

गेट्स हटवणार लक्षवेधी प्रकरण पुन्हा पेटलं; दानवेंच्या पीएला तहसीलदाराने झापलं, वाचा AटूZ फोनकॉल संवाद

यावेळी नितीन गडकरी यांनी टोल नाक्यावर लागणाऱ्या लांब रांगांबाबत चिंता व्यक्त केली आहे. सॅटेलाईट बेस्ड टोलिंगवर आयोजित वर्कशॉपच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते टोल टॅक्सबाबत मोकळेपणानं बोलल्याचं पाहायला मिळालं. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजे (NHAI) नव्या व्यवस्थेअंतर्गत टोल गेट्स हटवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मला टॅग करून कळवतात

रस्त्यांबाबत जर चांगल्या सुविधा दिल्या जात नसतील तर त्यांनी टोल का भरावा. आणि लोकांना टोल का आकारला जावा असा प्रश्न यावेळी गडकरी यांनी उपस्थित केला. जेव्हा कोणत्या रस्त्याची स्थिती चांगली नसते तेव्हा मला त्याच्या तक्रारी मिळत असतात. अनेक जण सोशल मिडियावर मला टॅग करून यासंदर्भात कळवत असतात, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले आहेत.

नाराजीचा सामना करावा लागतो

ज्या ठिकाणी खूप चांगले रस्ते बनत आहेत, त्याठिकाणी प्रवाशांनी शुल्क द्यायला हवा. जर तुम्ही खड्डे आणि चिखलाच्या रस्त्यासाठी देखील पैसे आकारत असाल तर चुकीचं आहे. तुम्ही असं करत असाल तर लोक नक्कीच नाराज होतील आणि त्यांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागेल, असंही गडकरी यावेळी म्हणाले आहेत.

वेळ कमी व्हायला पाहिजे “आता विरोधकांनाही जास्त संधी द्याल”; बिर्लांना शुभेच्छा देत राहुल गांधींचीही कडी

टोल नाक्यावर रांगेत उभं राहणाऱ्या लोकांचं दु:ख राष्ट्रीय राजमार्ज एजेन्सिच्या अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तसंच, तक्रार दाखल करणं आणि त्याचं निवारण करणं याच्यातील वेळ कमी व्हायला पाहिजे अशा प्रकारचे मेकॅनिझम तयार केलं गेलं पाहिजे, अशा सुचनाही गडकरी यांनी यावेली केल्या आहेत.

follow us

वेब स्टोरीज