Nitin Gadkari Oath : नितीन गडकरींनी तिसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ

Nitin Gadkari Oath : नितीन गडकरींनी तिसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ

Nitin Gadkari Oath : मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून  राजनाथ सिंह (Rajnath Singh), अमित शाह (Amit Shah) आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी शपथ घेतली आहे. मोदी सरकारमध्ये (Modi Government) सलग तिसऱ्यांदा नितीन गडकरींनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मोदी सरकारमध्ये 2014 पासून नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते विकास व दळणवळण मंत्रालयाचे मंत्रिपद आहे. यावेळी देखील त्यांना रस्ते विकास खात्याचे मंत्री केले जाणार असल्याची चर्चा आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नागपूर लोकसभा (Nagpur Lok Sabha) मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा पराभव केला होता. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या नितीन गडकरीने 1 लाख 37 हजार मतांनी पराभव केला आहे.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा मिळाल्याने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली होती. यानंतर आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे.

अठरावी लोकसभा : 78 टक्के ग्रॅज्यूएट, 37 टक्के व्यावसायिक अन् ‘MP’त आठवेळचा एकमेव खासदार

यावेळी एनडीएचे सर्व घटक पक्षातील नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 , काँग्रेसला 99, समाजवादी पक्षाला 36, टीडीपीला 15, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूला 12, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 07 जागांवर विजय मिळाला आहे.

“मैं नरेंद्र दामोदरदास मोदी..” तिसऱ्यांदा शपथ घेत मोदी पंतप्रधानपदी विराजमान

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज