नव्याने सत्तेत येणार मोदी सरकार फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामण यांच्या पतीचे मोठे विधान

नव्याने सत्तेत येणार मोदी सरकार फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामण यांच्या पतीचे मोठे विधान

Parakala Prabhakar on PM Modi : निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या (BJP) नेतृत्वातील एनडीए (NDA)आघाडीने सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) निवासस्थानी एनडीएची बैठक झाली. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट आहे. दरम्यान, नव्यानं सत्तेत येणार मोदी सरकार फार काळ टिकणार नाही, असे मत निर्मला सीताराम यांचे पती-अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर (Parakala Prabhakar) यांनी व्यक्त केलं.

12 लाखांच्या ‘या’ शानदार कारवर मिळत आहे 2.5 लाख रुपये वाचवण्याची संधी; जाणून घ्या ऑफर 

निवडणूक निकालानंतर एका वृत्त वाहिनीला परकला प्रभाकर यांनी मुलाखत दिली. यावेळी बोलतांना त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, यंदाचा लोकसभेचा निकाल म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीला चपराक आहे. कारण, नरेंद्र मोदींनी सरकार ज्या पध्दतीनं चालवल ते आवडल नाही, असं म्हणत त्यांनी मोदींचा बाहुबली सारखी व्यक्ती असा उल्लेख केला.

मशागत करुनही पेरा उगवलाच नाही… राजू शेट्टींचा दारुण पराभव का झाला? 

ते म्हणाले, नरेंद्र मोदींचे नवे सरकार देशात किती काळ टिकेल याची अजिबात खात्री नाहबी. मुळात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर येणार का, ही महत्त्वाची बाब आहे. सरकार सत्तेवर आले तरी ते लोकसभेत विश्वासदर्शक ठराव पास करू शकेल की नाही, याची खात्री नाही,असं प्रभाकर म्हणाले.

मोदींचे सरकार सत्तेवर आले तरी पुढील काही महिन्यांत त्यांच्याच पक्षाच्या किंवा आरएसएस किंवा एनडीएच्या मित्रपक्षांच्या दबावाखाली पंतप्रधान बदलले जाण्याची शक्यता आहे. भाजप आता चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि नितीशकुमार यांच्या जेडीयूवर अवलंबून असून नायडू आणि नितीशकुमार हे कधीही बाहेर पडण्याचीही शक्यता आहे, असं प्रभाकर म्हणाले.

मोदी कधी शपथ घेणार?
एनडीए आघाडीतील 21 घटक पक्षांनी पंतप्रधानपदासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाला पाठिंबा दिला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार नरेंद्र मोदी 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता शपथ घेऊ शकतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज