Bajrang Sonawane On Walmik Karad : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज संयशित आरोपी वाल्मिक कराड सीआयडीसमोर (CID) शरण आला आहे. तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) निर्घृण हत्याप्रकरणात राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे.
वाल्मिक कराड (Walmik Karad) सीआयडीसमोर शरण येताच बीडचे खासदार बजरंग सोनावणे (MP Bajrang Sonawane) यांनी प्रतिक्रिया देत कराड हे जर निर्दोष आहेत. तर त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी शरण यायला पाहीजे होते. एवढा वेळ का लावला, असा सवाल उपस्थित केला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाल्मिक कराड गेल्या काही दिवसांपासून फरार असल्याने त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत होती. तर भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले होते त्यामुळे वाल्मिक कराड याला अटक कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.
पुण्यातील सीआयडी कार्यालयात आज सकाळी 12 वाजता वाल्मिक कराड शरण आला आहे. मात्र त्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपला या प्रकरणात कोणताही संबंध नाही आणि जर पोलीस चौकशीत माझ्यावर आरोप सिद्ध झाले तर मला न्यायालय जी शिक्षा देणार ती मान्य असेल असं म्हटले आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडने केली आहे.
तर दुसरीकडे जर आरोपीला अटक करण्यास ऐवढा वेळ लागत असेल तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची. आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे सीडीआरनुसार जे आरोपी आहेत ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते तीन आरोपी फरार आहे त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख (Vaibhav Deshmukh) यांनी दिली आहे. तसेच गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.