Download App

गुन्हा केला मग शिक्षातर होणारच, राहुल गांधींच्या शिक्षेवरून शेलारांनी काँग्रेसला डिवचले

  • Written By: Last Updated:

मुंबई : राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य हे केवळ बदनामी कारक नाही तर एका ओबीसी समाजाला हिणवन, उपरोधिक बोलणं, त्यासमाजाची टिंगल करणार हे वक्तव्य होत. म्हणून त्या समाजातील लोक कोर्टात गेले त्यांनी न्याय मागितला आणि कोर्टाने त्यांना न्याय देतं आरोपी राहुल गांधी यांना दोषी मानत दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सर्व घटनात्मक, दंडात्मक, संविधानात्मक, प्रक्रिया पूर्णकरत राहुल गांधी यांचा गुन्हा सिद्ध झाला म्हणून त्यांना शिक्षा झाली. असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे शेलार म्हणाले राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केला. त्यांचा आम्ही निषेध करतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी (ता.२५) राज्यभर आंदोलन करून राहुल गांधी यांचा निषेध करणार आहोत. मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन होईल. आणि राज्यभरात भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत असे शेलारांनी सांगितले.

Devendra Fadanvis लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच शतकात एकच आशा भोसले! 

उद्धव ठाकरे यांच्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शेलार म्हणाले, ज्यांचा नागरिकशास्त्राशी संबंध नाही त्यांनी लोकशाही वगैरे शब्द प्रयोग करू नये. नागरिकशास्त्र हे फोटो कॅमेरातून शिकता येत नाही. ते उघड्या डोळ्यांनी शिकावे लागते. उद्धव ठाकरेंकडून लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात बोलले जात आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी त्याबाबत उद्धव ठाकरेंना शिकवणी देण्यासाठी तयार आहे. त्यांना शिकवणीची आवश्यकता आहे. ओबीसी समाजाची बदनामी करणे; त्यांना हिणवणे हा गुन्हा आहे याची माहिती उद्धव ठाकरेंना नाही. त्यांनी शिकून घ्यावे नाहीतर आमची शिकवणी लावावी अशीही टीका त्यांनी केली. भारतीय संविधानानुसार कुठल्याही समाजाची बदनामी झाल्यास त्या समाजातील व्यक्तीला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे हे उद्धवजी यांना माहित नाही म्हणूनच त्यांना शिकवणीची गरज आहे. न्यायालयात झालेला निवाडा बंधनकारक असतो याचीही त्यांना माहिती नाही. न्यायालयाने शिक्षा दिल्यावर भारतीय संविधानाने संसदेत केलेला कायदा लागू होतो याची त्यांना माहिती नाही म्हणून त्यांना शिकवणीची गरज आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना नागरिक शास्त्राचे पुस्तकही पाठवू. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, असे बोलायला त्यांची ही काही उरलेली शाखा नव्हे असा टोलाही भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी लगावला.

Tags

follow us