IMD Rain Alert : पुणे, कोल्हापूर, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; अलर्ट जारी

IMD Rain Alert : राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे 22 मे पासून राज्यातील काही भागात

IMD Rain Alert

IMD Rain Alert

IMD Rain Alert : राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे 22 मे पासून राज्यातील काही भागात पावसाची सुरुवात झाल्याने सध्या राज्यात संमिश्र हवामान दिसून येत आहे. संमिश्र हवामानामुळे राज्यातील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी करण्यात आले आहे तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची (IMD Rain Alert) शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत असल्याने दुपारी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये आज कोरडे वारे वाहण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.

मोठी बातमी! व्हाईट हाऊसबाहेर अंदाधुंद गोळीबार; हल्लेखोर ठार

तर गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. या भागात पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Exit mobile version