Iran Israel War : गेल्या अकरा दिवसांपासून सुरु असणाऱ्या इराण आणि इस्त्रायल युद्धाचा फटाक भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. देशातील अनेक शहरात गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने याचा परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येत आहे.
तर दुसरीकडे एलपीजीचा (LPG) पुरवठा लवकर सामान्य झाला नाही तर मुंबईतील रेस्टॉरंट (Mumbai Restaurants) पुढील दोन दिवसांत बंद कारवे लागू शकतात असा दावा हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने (Hotel and Restaurant Association) केला आहे.
गॅसचा तुटवडा आणखी वाढत आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील सर्व रेस्टॉरंट पुढील दोन दिवसांत बंद करावे लागू शकतात. सध्या असोसिएशनच्या सुमारे 10 ते 12 टक्के सदस्यांना गॅस पुरवठ्याची समस्या येत असल्याचा दावा इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी (Vijay Shetty) यांनी केला आहे.
तर आता परिस्थिती वेगाने बिकट होत आहे. मंगळवारपर्यंत हे संकट 60 टक्के रेस्टॉरंटे्सपर्यंत पोहोचू शकते आणि बुधवारपर्यंत 100 टक्के रेस्टॉरंट्स प्रभवित होण्याची शक्यता आहे. आम्ही या मुद्द्याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही संपर्क साधण्यात आला असं देखील यावेळी विजय शेट्टी म्हणाले.
तर दुसरीकडे घरगुती एलपीजी गरजा पूर्ण करण्यासाठी तेल शुद्धीकरण कारखान्यांना उत्पादन वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. सध्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘या’ 4 राशींना होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?-
याच बरोबर आता साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी 25 दिवसांचा इंटर-बुकिंग कालावधी लागू करण्यात आला आहे. सरकारने इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या कंपन्यांना घरगुती गरजा आधी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
