‘टेरेरिस्ट’ चे स्पेलिंग लिहून दाखवा, मंत्री शिरसाटांच्या आरोपावर इम्तियाज जलीलांचं प्रत्युत्तर

Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणावरुन सध्या संभाजीनगरमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते

Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat

Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat

Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणावरुन सध्या संभाजीनगरमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावरुन माजी खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना अर्बन दहशतवादी म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जलील यांच्या अटकेची मागणी करणार असं म्हटलं आहे. तर आता इम्तियाज जलील यांनी देखील शिरसाट यांना प्रत्युत्तर देत त्यांच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे. संजय शिरसाट यांनी ‘टेरेरिस्ट’ ची स्पेलिंग लिहून दाखवावी असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले की, मी त्यांना फारसे महत्त्व देत नाही. शहराचे दुर्दैव आहे की, आम्हाला इतका भ्रष्ट नेता पालकमंत्री म्हणून मिळाला. त्यांनी मला अर्बन दहशतवादी म्हटले आहे. त्यावर माझे एकच उत्तर आहे की, त्यांनी टेरेरिस्ट चे स्पेलिंग लिहून दाखवावे असं माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले.

काय म्हणाले होते संजय शिरसाट ?

नगरसेवक मतीन पटेल हा फक्त मोहरा आहे. खरा म्होरक्या इम्तियाज जलील हा अर्बन दहशतवादी आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करुन इम्तियाज जलील यांच्या चौकशीची आणि त्यांच्या अटकेची मागणी करणार आहे असं राज्याचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; सप्टेंबर 2026 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी-

नेमकं प्रकरण काय?

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोप असलेल्या निदा खानला एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरातून अटक केली होती. यानंतर हे घर अनाधिकृत असल्याचे सांगत महापालिकेने घर जमीनदोस्त केले. यावरुन सध्या संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यात शाब्दिक वार सुरु आहे.

Exit mobile version