Video : छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला; काय म्हणाले जलील?

छत्रपतीस संभाजीनगरमध्ये प्रचार सुरू असतानाच ही घटना घडली आहे, जलील यांच्या वाहानावर धारदार शस्त्रानं वार करण्याचा प्रयत्न झाला आहे.

News Photo   2026 01 07T151503.712

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. (Mim) एमआयएमचे माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. प्रचार सुरू असतानाच ही घटना घडली आहे, त्यांच्या वाहानावर धारदार शस्त्रानं वार करण्याचा प्रयत्न झाली आहे.

नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे, महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं. नव्या लोकांना संधी देण्यात आली, असा आरोप करत नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभेतील बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्याचा भाजपलाच विसर?; अकोटमध्ये ओवैसींच्या एमआयएमशी युती

महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं, नव्यांना संधी देण्यात आली, तसंच स्थानिक लोकांना देखील डावलण्यात आलं, असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे, त्याच रागातून जलील यांच्या वाहनावर हा हल्ला करण्यात आला.

काँग्रेस उमेदवार सलीम कुरेशींवर आरोप

कलीम कुरेशी काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांनी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आला आहे. एमआयएमने संभाजीनगरमध्ये 22 नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्यांना संधी दिली आहे. त्यावेळी, देखील असंतोष पसरला होता. त्याचे पडसाद बायजीपुरा येथे पाहायला मिळाले होते. आज घडलेल्या राड्यात एक जण जखमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

हल्ला झाला त्या वाहनात इम्तियाज जलील पुढच्या सीटवर बसले होते. सुरुवातीला काळे झेंडे दाखवल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. इम्तियाज जलील यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली आहे, अशी माहिती आहे. प्रचार रॅलीच्या दरम्यान बायजीपुरा जिन्सी भागात ही घटना घडली आहे. एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी आहे. इतर जे कार्यकर्ते आहेत, त्या संदर्भात चौकशी सुरु आहे.

जलील यांची प्रतिक्रिया

‘राजकारणात असे प्रकार होत असतात. मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही. लोकशाहीने मला कुठही जाण्याचा आणि पदयात्रा करण्याचा अधिकार दिलेला आहे, मी ते करत आहे. आता कुणाला आम्ही इकडे येऊ नये याबाबत आक्षेप असेल, मात्र आमचा उमेदवार आहे त्यामुळे आम्ही प्रचार करत आहोत. आता 16 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा तुम्हाला कळेल की काळ्या झेंड्यांचा अर्थ काय आहे आणि हिरव्या झेंड्याचा अर्थ काय आहे.’

follow us