महापालिका निवडणुका कधी होणार? संभाव्य तारीख समोर; जाणून घ्या सर्वकाही
Municipal Corporation Election 2025 Date : राज्यात 2 डिसेंबर रोजी 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
Municipal Corporation Election 2025 Date : राज्यात 2 डिसेंबर रोजी 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे तर आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुका म्हणजेच जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला राज्यात 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे राज्यात महानगरपालिका आणि जिल्ह्यापरिषदेच्या निवडणुका कधी होणार? याबाबत अनेक तक्रवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्वाची माहिती समोर आली आहे.
राज्यात महानगरपालिका निवडणुकीची संभाव्य तारीख (Municipal Corporation Election 2025 Date) समोर आली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या आरक्षणाच्या घोळामुळे राज्य निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणूक दुसऱ्या टप्प्यात घेण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोग 15 किंवा 17 डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करु शकतो.
तर दुसरीकडे 32 पैकी 17 जिल्हापरिषदांमध्ये (Zilla Parishad) आरक्षणाच्या मर्यादाचे पालन न झाल्याने या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. 10 डिसेंबर रोजी महापालिकांची प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम होणार असून त्याचा आढावा राज्य निवडणूक आयोग घेणार आहे आणि यानंतर पुढील चार- पाच दिवसात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोग जाहीर करणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ नगरपंचायत नगरपालिकांच्या श्रीरामपूर 66.62% संगमनेर ७२.७५% राहुरी 72.46% राहता 77.87% श्रीगोंदा 79.84% शेवगाव 69.4% जामखेड 75.63% तर शिर्डी मध्ये 75.16% एकूण मतदानाची टक्केवारी काढले असता 72.25% एवढे मतदान झाले.#AhilyanagarNews #voting #vote #election pic.twitter.com/pmUXeCYgBX
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 3, 2025
Census 2027 : केंद्र सरकारची मोठी घोषणा; 2027 मध्ये दोन टप्प्यात होणार जनगणना
कधी होणार महापालिका निवडणूक?
राज्यात 2 डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार मात्र त्यापूर्वीच 15 किंवा 17 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग राज्यात महापालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, राज्यात 15 डिसेंबर ते 10 जानेवारीदरम्यान महापालिका निवडणुका होणार आहे. तर जिल्हापरिषद आणि पंचायत समितीसाठी 5 ते 30 जानेवारी दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे.
