सर्वात मोठी बातमी, सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतमोजणी 21 डिसेंबरला

Maharashtra Election 2025  : राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार असल्याचा मोठा निर्णय

  • Written By: Published:
Maharashtra Election 2025

Maharashtra Election 2025  : राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार असल्याचा मोठा निर्णय नागपूर खंडापीठाने दिला आहे. आज राज्यातील  264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी मतदार सुरु असून उद्या 3 डिंसेबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होता मात्र आता उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडापीठाने दिलेल्या आदेशानुसार आता 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) मोठा निर्णय घेत मतदानाच्या काही तासांपूर्वी 20 पेक्षा जास्त नगरपरिषदेच्या निवडणुका रद्द करत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता आणि या निवडणुकीसाठी नवीन कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आले आहे मात्र या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडापीठाने 21 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात सुनावणी दरम्यान खंडपीठाने सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मोठा निर्णय दिला. त्यामुळे आता राज्यात सर्व नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

अहिल्यानगर ब्रेकींग, बुरुड गल्लीमध्ये गोदामाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत बारामती, फलटण, दिग्रस, पांढरकवडा, वणी, मंगळवेढा, कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, घुग्गुस, अंजनगाव सुर्जी, धर्माबाद, मुखेड, बाळापूर, अनगर, बसमत, फुलंब्री आणि वाशिम नगर परिषदेच्या निवडणुका रद्द करत पुढे ढकल्या आहे.

धनुभाऊ तुमची लायकी आहे का? तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता; आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबळजनक दावा

 

follow us