Download App

India Alliance वाल्यांचे पंतप्रधान, अर्थमंत्री होण्याचे स्वप्न हास्य जत्रेलाही टफ फाईट देतील; शिंदेंचा टोला

  • Written By: Last Updated:

India Alliance : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Shinde) कोल्हापूरमध्ये बोलताना इंडिया आघाडीवर (India Alliance) टीका केली. ते म्हणाले की, या लोकांमध्ये कुणी पंतप्रधान कोणी अर्थमंत्री होण्याचे स्वप्न बघतायेत एकमेकांना मंत्री बनवतात त्यांच्या विधानांमुळे हास्य जत्रा या कार्यक्रमाला देखील ते स्पर्धा निर्माण करतील. शिंदे यांची आज कोल्हापूर येथील गांधी मैदानात जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.

दिल्लीसमोर लोटांगण घालायचे काम, आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

त्यांनी इंडिया आघाडी केली. मात्र त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवारी ठरवता आला नाही. त्यामुळे त्यांच्या आघाडीतून देखील एक एक करून सगळे सोडून चालले आहेत. त्यामुळे तुम्ही कशाच्या जोरावर पंतप्रधान मोदींना आव्हान देत आहात? त्यांचं काम कुठे. ते देशाला संपूर्ण जगात सन्मान प्राप्त करून दिला आहे. तसेच या लोकांमध्ये कुणी पंतप्रधान कोणी अर्थमंत्री होण्याचे स्वप्न बघतायेत एकमेकांना मंत्री बनवतात त्यांच्या विधानांमुळे हास्य जत्रा या कार्यक्रमाला देखील ते स्पर्धा निर्माण करतील.

‘घातक’चे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना 2 वर्षाचा तुरुंगवास, ‘या’ प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा

तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2019 मध्ये कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण अशा महापुरातील आठवणी सांगितल्या त्यावेळी ते म्हणाले की, ज्या भागात पाणी साठलं होतं त्या भागातील लोकांनी आपली गुरं देखील स्वतःसोबत घराच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर नेल्या होत्या. मात्र दुसरीकडे मुंबईमध्ये 26 जुलैला पूर आलेला असताना बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटे सोडत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणारे कुठे आणि या कोल्हापूर मधील लोक आपल्या गोधनाला देखील आपल्याबरोबर दुसऱ्या मजल्यावर घेऊन जातात. हा फरक आहे.

इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस सोडेल? कमलनाथांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पक्षाने फेटाळल्या

त्यामुळे ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. वैचारिक व्याभिचार केला. त्यांना आता घरी बसवण्याची ही वेळ आहे. मुघलांच्या घोड्यांना ज्याप्रमाणे पाण्यात देखील संताजी धनाजी दिसायचे त्याचप्रमाणे ठाकरेंकडून एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे हा जप चालू असतो. शिवशाप आणि आरोप केले जातात. मात्र एका शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का? की फक्त सोन्याच्या चमच्या तोंडात घेऊन जन्मल्याने मुख्यमंत्री व्हायचं आहे का असावा यावेळी शिंदे विचारला.

Ind VS Eng: यशस्वीने शानदार शतक झळकविले; पण आनंदाच्या भरात केलेली चूक आली अंगलट

अगोदर देशद्रोही आणि देशविरोधी असणाऱ्यांची हात मिळवणी केली आणि आता निवडणुका तोंडावर आल्यानंतर त्यांना हिंदुत्व आठवलं. आता त्यांना राम आठवला. पहिले म्हणायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे चेष्टा करायचे. पण मोदी यांनी मंदिरे बनवलं. तारीखही सांगितली उद्घाटनही झालं. म्हणजे मुह मे राम आणि बगल मे छुरी. त्यामुळे मुखी राम आणि हाती काम असावं. कारण घरी बसणाऱ्यांच्या पाठीशी लोक उभे राहत नाहीत. तसेच ठाकरे गटात शिल्लक राहिलेल्या लोकांसाठी ते सरकार स्थापन झाल्यापासून रोज भविष्यवाणी वाचायचे की, आज सरकार पडणार उद्या सरकार पडणार. सगळे ज्योतिषी थकले पण सरकार काय पडले नाही. मात्र ते आधी आता बंद झालं.

मी काहीही काम केलं. तर त्यांना पोटदुखी होते दाओसला गेलो तरी प्रॉब्लेम, गावात शेती करायला गेलो, तरी प्रॉब्लेम हेलिकॉप्टरने गेलो तरी प्रॉब्लेम, मुंबईतील रस्ते धुवायला गेलो तरी प्रॉब्लेम तुम्ही असाच जळफळाट करत राहा. दोन लढाया असतात एक मुद्द्याची आणि गुद्द्याची तुम्ही गुद्द्याच्या लढाईवर आले. तरी आम्ही गुद्द्याची लढाई करणार नाही. मुद्द्याची लढाई लढू तुमच्या आरोपांना उत्तर कामाने देणार.

follow us