‘घातक’चे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना 2 वर्षाचा तुरुंगवास, ‘या’ प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा

  • Written By: Published:
‘घातक’चे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना 2 वर्षाचा तुरुंगवास, ‘या’ प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा

Rajkumar Santoshi : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक अशी राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊन्स प्रकरणी ही शिक्षा कोर्टाने दिली आहे. राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावत असतांना चेकच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून जमा करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस सोडेल? कमलनाथांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पक्षाने फेटाळल्या 

सविस्तर वृत्त असेल की, राजकुमार संतोषी यांनी यांनी जामनगरचे व्यापारी अशोकलाल यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले होते. पण ते पैसे परत केलेच नाहीत. यानंतर अशोकलाल हे राजकुमार संतोषींच्या विरोधात न्यायालयात गेले. त्यानंतर जामनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

चिपळूण राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या तिघांना अटक, 300 ते 400 जणांवर गुन्हा दाखल 

दरम्यान, संतोषी यांचे चेक बाऊन्स प्रकरण 2015 चे आहे. राजकुमार संतोषी 2019 मध्ये न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी अशोकलाल यांच्या वकिलाने राजकुमार संतोषी आणि अशोकलाल हे चांगले मित्र असल्याचे सांगितले होते. 2015 मध्ये संतोषी यांनी अशोकलाल यांच्याकडून 1 कोटी रुपये घेतले होते. ही रक्कम परत करताना संतोषी यांनी अशोकलाल यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे दहा धनादेश दिले होते. पण 2016 मध्ये हे चेक बाऊन्स झाले.

दरम्यान, अशोकलाल यांनी संतोषी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये संपर्क नव्हता. यानंतर अशोक लाल यांनी जामनगर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर कोर्टाने आता न्यायालयाने कठोर निर्णय घेतला आहे. प्रत्येक चेकच्या दुप्पट रक्कम भरण्याचे आदेश दिले.

राजकुमार संतोषी हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. सनी देओल, शाहिद कपूर, रणबीर कपूर, कतरिना कैफ, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांनी ‘खाकी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘दामिनी’ असे अनेक चित्रपट केले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube