मुंबई : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस आणि अजित पवार असे त्रिशूळ सरकार अस्तित्वात आले आहे. एकीकडे हे तिन्ही नेते सरकार वेगाने काम करत असल्याचे सांगत असतानाच आगामी लोकसभेत राज्यातील जनता मविआच्या फेव्हरमध्ये असल्याचे समोर आले आहे. यामुळे भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची धाकधूक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा येतील असा अंदाज इंडिया टुडे – सी व्होटरच्या एका सर्व्हेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
‘अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट नाही’; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ!
लोकसभा निवडणुकीत मविआतील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेना, शरद पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या आघाडीला सर्वाधिक 28 जागा मिळतील असा अंदाज सर्व्हेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, या निवडणुकांमध्ये ठाकरे व पवारांच्या पक्षांचा 18 जागा मिळतील. तर काँग्रेसचा 10 जागांवर विजय होईल असे सांगण्यात आले आहे.
सर्व्हेनंतर शिंदे-फडणवीस अजितदादांची धाकधूक वाढली
इंडिया टुडे सी व्होटरच्या या सर्व्हेनंतर राज्यात अस्तित्त्वात असलेल्या शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांची धाकधूक वाढली आहे. एकीकडे एकहाती विजयासाठी भाजप राज्यातील मोठ्या नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजपच्या या खेळीमुळे जनसामान्यांमध्ये भाजपप्रती नकारात्मक भावना निर्माण होत असून, त्याचा फटका आगामी लोकसभेत भाजपला बसणार असल्याचे चित्र सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. तर, दुसरीकडे राज्यातील जनता मविला पुन्हा संधी देण्याच्या विचारात आहे.
‘काही लोकांची पावलं NDA च्या दिशेने?’ पवारांच्या वक्तव्यानंतर मंत्री सामंतांना वेगळाच संशय
भाजपला केवळ 15 जागा
सध्या भाजपच्या सर्वाधिक जागा असल्याने तो सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत आहे. मात्र, असे असताना या सर्व्हेत भाजपला केवळ 15 जागांवर विजय मिळतील असे सांगण्यात आले आहे. तर भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या शिंदे आणि अजित पवार गटाला केवळ 5 जागांवर विजय मिळवता येईल.
वडेट्टीवारांना पवारांवर पूर्ण विश्वास; विधानाचा अर्थ अजितदादा अन् फडणवीसांना विचारा
जुलै ते ऑगस्ट दरम्यान लोकसभेच्या 543 मतदार संघात इंडिया टुडे आणि सी व्होटरकडून सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेदरम्यान 25 हजार 951 जणांनी आपली मते नोंदवली होती. सर्व्हेदरम्यान, लोकसभा निवडणुकीत NDAला 306, इंडिया आघाडीला 193, तर इतर पक्षांना 44 जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे.