Why Indian Use To Hang Clothes In Balcony For Drying : भारतातील अनेक शहरांमधील उंच टॉवर्स, आलिशान सोसायट्या किंवा अपार्टमेंट्सकडे नजर टाकली तर, एक गोष्ट हमखास दिसते ती म्हणजे बाल्कनीत वाळत घातलेले कपडे. मुंबई असो, पुणे, दिल्ली किंवा बंगळुरू… हे दृश्य जवळपास प्रत्येक शहरात सारखेच आहे. पण कधी विचार केला आहे का, की घरात वॉशिंग मशीन, ड्रायर आणि आधुनिक सुविधा उपलब्ध असतानाही भारतीय अजूनही बाल्कनीतच कपडे का वाळवतात? यामागे हवामान, राहणीमानातील बदल आणि आर्थिक गणित अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया..
तुम्ही पण AI शी हिंदी-मराठीत गप्पा मारताय मग, लागू शकतो ‘लँग्वेज टॅक्स’; वाचा डिटेल्स
बाल्कनीत कपडे वाळवण्याचं नेमकं कारण काय?
भारताच्या बहुतांश भागांमध्ये वर्षभर पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा उपलब्ध असते. त्यामुळे कपडे नैसर्गिकरित्या लवकर वाळतात. सूर्यप्रकाशामुळे केवळ कपडे लवकर सुकत नाहीत, तर सूर्य प्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच UV किरणांमुळे कपड्यांमधील बॅक्टेरिया आणि जंतूंचा नायनाट होण्यास मदत होते. यामुळे कपडे नैसर्गिकरीत्या स्वच्छ आणि निर्जंतुक होतात. त्यामुळे अनेकजण ड्रायरऐवजी नैसर्गिक पद्धतीने कपडे वाळवणे अधिक पसंत करतात.
अंगण आणि गच्चीची जागा बाल्कनीने घेतली
एकेकाळी भारतीय घरांमध्ये मोठे अंगण किंवा मोकळी गच्ची असत, जिथे कपडे वाळवणे सोपे होते. मात्र, शहरीकरणाच्या रेट्यात आणि वाढत्या लोकसंख्येमुळे घरांचा आकार लहान होत गेला. गगनचुंबी इमारती आणि ‘फ्लॅट कल्चर’मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी बालकनी हीच एकमेव जागा उरली, जिथे थोडी मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळेच अंगण आणि छताची जागा आता बालकनीने घेतली आहे.
चॅटिंगमध्ये पार्टनरचं प्रत्येक मेसेजला फक्त ‘Hmm’ उत्तर येतंय… काय समजावं?
ड्रायर मशीन का ठरत नाही ‘पहिली पसंती’?
अमेरिका आणि युरोपसारख्या देशांमध्ये कपडे वाळवण्यासाठी इलेक्ट्रिक ड्रायरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र भारतात परिस्थिती वेगळी आहे. ड्रायर मशीन महाग असतात आणि त्यांचा वीज वापरही अधिक असतो. वीज खर्च वाचवण्यासाठी आणि नैसर्गिक साधनांचा वापर करण्यासाठी अनेक भारतीय अजूनही बाल्कनीत कपडे वाळवणे पसंत करतात.
बदलत्या काळात ‘स्मार्ट’ बनली बाल्कनी
शहरांमधील मर्यादित जागेच्या समस्येमुळे आता कपडे वाळवण्याच्या पद्धतीही आधुनिक झाल्या आहेत. बाजारात सीलिंग-माउंटेड ड्रायर, फोल्डेबल वॉल-माउंटेड हँगर, पुली सिस्टिम असलेले ड्रायिंग रॅक यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वापर झाल्यानंतर हे सहजपणे दुमडून ठेवता येतात, त्यामुळे जागाही वाचते आणि बाल्कनीचा सौंदर्यही टिकून राहते.
Reels : फक्त अजून एक रील… वाढत्या स्क्रोलिंगमुळे मेंदूत होतोय ‘डिजिटल एम्नेशिया’चा लोचा
भारतीयांच्या बाल्कनीत दिसणारे कपडे हे केवळ दैनंदिन कामाचे प्रतीक नाहीत, तर ते देशाच्या हवामान, आर्थिक विचारसरणी आणि बदलत्या शहरी जीवनशैलीचे प्रतिबिंब आहे. त्यामुळेच आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही भारतातील उंच टॉवर्स, आलिशान सोसायट्या किंवा अपार्टमेंट्समधील घरांमध्ये बाल्कनीतील कपडे वाळवण्याची परंपरा आजही कायम आहे.
