Download App

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरची कारागृहातून सुटका; विमानातून मुंबईला रवाना

राष्ट्रपुरुषांचा अवमान करुन इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका झालीयं.

Prashant Koratkar News : राष्ट्रपुरुषांचा अवमान करुन इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना मोबाईलवरुन धमकी देणाऱ्या प्रशांत मुरलीधर कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका झालीयं. न्यायालयाने कोरटकरचा अटी-शर्तींसह 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. मात्र कागदोपत्रांच्या पुर्ततेमुळे त्याचा कारागृहात मुक्काम वाढला होता. अखेर आज कोरटकरला पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये कारागृहाबाहेर आणण्यात आलं.

ऑफीसमध्ये जा, आराम करा अन् लाखो रुपये पगार मिळवा.. ‘या’ कंपनीतील जॉबही खास

प्रशांत कोरटकरला दुपारच्या सुमारास कळंबा कारागृहातील अंडा सेलमधून बाहेर काढण्यात आणण्यात आले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानूसार त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती वरिष्ठ अधीक्षक नागनाथ सावंत यांनी दिलीयं. दिनांक. 6 रोजीच कोरटकर याल न्यायालयाने जामीन मंजूर केला पण त्याचे कागदपत्रे कळंब कारागृहात पोहोचू शकले नसल्याने त्याची सुटका थांबली होती. अखेर आज त्याची सुटका झाली असून कोरटकर विमानाने मुंबईला रवाना झालायं.

बाजारातील चढ उताराने हैराण झालात, मग ‘या’ 5 सोप्या स्कीममध्ये गुंतवणूक कराच!

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून प्रशांत कोरटकरने धमकी दिली होती. त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. याच प्रकरणात प्रशांत कोरटकरवर कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला तेलंगणामधून अटक केली होती. त्यानंतर तो 15 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होता.

दरम्यान, फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये. पुरावे नष्ट करू नयेत. चौकशीत पोलिसांना सहकार्य करावे. पोलिसांच्या परवानगीशिवाय बाहेरगावी जाऊ नये, अशा अटींचे पालन करण्याच्या सूचना प्रशांत कोरटकरला न्यायाधीशांनी दिल्या आहेत.

follow us