बाजारातील चढ उताराने हैराण झालात, मग ‘या’ 5 सोप्या स्कीममध्ये गुंतवणूक कराच!

Investment Tips : जागतिक बाजारात सध्या उलथापालथीचा काळ सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) टॅरिफ निर्णयाला तीन महिन्यांची स्थगिती दिल्यानंतर जागतिक अर्थचक्र पूर्वपदावर येत आहे. तरीही धाकधुक कमी झालेली नाही. अशा परिस्थितीत तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय (Investment) शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि सुरक्षित गुंतवणूक योजनांची माहिती देणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या पैशांची सुरक्षित गुंतवणूक करू शकाल.
आम्ही यामध्ये पीपीएफ, टाइम डिपॉझिट यांसारख्या पोस्टाच्या योजनाही समाविष्ट केल्या आहेत. कारण पोस्टातील गुंतवणूक नेहमीच (Indian Post) सुरक्षित मानली जाते. याबरोबरच म्युच्युअल फंड, ईएलएसएस फंड आणि बँक एफडी (Bank FD) यांचाही समावेश केला आहे.
पब्लिक प्रोविडेंट फंड
पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोविडेंट फंड ही योजना (Public Provident Fund) लोकप्रिय आहे. या योजनेत वार्षिक 7.1 टक्के दराने परतावा मिळतो. तसेच कपाउंडिंगचाही फायदा मिळतो. या योजनेत कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
घरबसल्या फक्त 10 मिनिटांत एक कोटींचं कर्ज; मुकेश अंबानींच्या ‘जिओ’ची खास स्कीम
नॅशनल सेविंग टाइम डिपॉझिट स्कीम
पोस्ट खात्याकडून अनेक बचत योजना राबवल्या जातात. पोस्टातील योजनांवर व्याज कमी मिळत असले तरी पोस्टातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित असते. पोस्ट सरकारी संस्था आहे. त्यामुळे येथे गुंतवणूकदरांचा पैसा सुरक्षित असतो. म्हणून पोस्टात पैसे गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जाते. पोस्टाची टाइम डिपॉझिट स्कीम सुद्धा (National Saving Time Deposit Scheme) खास अशीच आहे. जर तुम्हाला तुमच्या पैशांची सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर ही योजना चांगली आहे. किमान एक हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता.
या योजनेत व्याज वार्षिक आधारावर दिले जाते. व्याज तिमाहीवर कॅल्क्युलेट केले जाते. या योजनेत तुम्ही 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत 7.5 टक्के दराने परतावा मिळतो.
बँक मुदत ठेव
बँकेतली गुंतवणूक सुद्धा सुरक्षित मानली जाते. एखाद्या चांगल्या खासगी किंवा सरकारी बँकेत तुम्ही एफडी (Fixed Deposit) करू शकता. या बँकांत साधारण 7 ते 8 टक्के परतावा मिळतो. शेअर बाजारातील चढ उताराचाही या योजनेवर काहीच परिणाम होत नाही. मुदत ठेवीवर मिळणारे व्याज कालावधीवर ठरते.
दररोज फक्त 50 रुपये बचत करा अन् करोडपतीच व्हा; जाणून घ्या, मालामाल होण्याचं गणित
म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणुकीवर 12 टक्के परतावा मिळतो. हा परतावा शेअर बाजारातील (Share Mariket) चढ उतारानुसार मिळतो. तुम्ही म्युच्युअल फंड डेट आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी करू शकता. तसेच हायब्रीड फंड पोर्टफोलियोमध्ये सहभागी करू शकता. ईटीएफसोडून सांगितलेले सर्व फंडात शेअर बाजाराचा अप्रत्यक्ष प्रभाव पडतो.
ईएलएसएस फंड
इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम (ईएलएसएस) टॅक्स सेव्हिंगमुळे लोकप्रिय आहे. या योजनेत लॉक इन पिरियड तीन वर्षांचा असतो. ELSS अंतर्गत इक्विटीमध्ये गुंतवणूक केली जाते. ज्यामुळे यामध्ये जोखीम जास्त राहते. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही आधी जोखमीचा विचार करा. कारण कधी कधी यामध्ये नुकसानही होऊ शकते. ही योजना टॅक्स सेव्हिंगचा फायदा मिळवून देते. त्यामुळे तुम्हाला वाटले तर तुम्ही या योजनेला तुमच्या पोर्टफोलियो मध्ये समाविष्ट करू शकता.