Download App

औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करू, अजितदादांची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2025 : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2025-26 साठी अर्थसंकल्प

  • Written By: Last Updated:

Maharashtra Budget 2025 : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर करत आहे. यावेळी अजित पवार यांनी मोठी घोषणा करत औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार 20 लाख कोटी गुंतवणूक आणि 50 लाख रोजगाराच्या निर्मितीचं लक्ष असणार आहे. चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण तयार करण्यात येणार आहे. नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहे. असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर करत असताना दिली.

तसेच यावेळी अजित पवार यांनी जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार 220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग 26 टक्के असणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. वाढवण बंदरामुळे सुमारे 300 दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक मालहाताळणी क्षमता निर्माण होणार आहे. जवाहरलाल नेहरु बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे.

सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे. या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्‍या जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल.

चिकन खाताय? मग सावध व्हा! केंद्र सरकारचा 9 राज्यांना अलर्ट; पत्रात नेमकं काय?

वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या बंदराजवळ असणार आहे. हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडण्यात येणार असं देखील अजित पवार म्हणाले.

राज्यात येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार

तसेच राज्यात येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार असल्याची घोषणा देखील यावेळी  अजित पवार यांनी केली. यावेळी अजित पवार म्हणाले की, उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तसेच पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. ⁠तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. असं अजित पवार म्हणाले.

तसेच महानगरातील प्रवाशांना वातानुकुलित प्रवाससाठी मेट्रोचे प्रकल्प कार्यान्वित, मुंबई पुण्यात 64 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होतील. पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तर नागपूर मेट्रोचा पहिला 40 किमीचा टप्पा पूर्ण झाला आहे. ठाणे मेट्रो, पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली.

follow us