मोठी बातमी ! अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक

Abhijit Dipke : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आंदोलनाच्या ठिकाणाहून जबरदस्तीने हटवल्याने कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके

Abhijit Dipke

Abhijit Dipke

Abhijit Dipke : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आंदोलनाच्या ठिकाणाहून जबरदस्तीने हटवल्याने कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलन सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे. तर आता अभिजीत दिपके यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर (Jantar Mantar) गेल्या 20 दिवासांपासून सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करत आहे. आज सकाळी त्यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनाच्या ठिकाणाहून हटवले आणि पुढील उपचारासाठी दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना जबरदस्तीने हटवल्यानंतर कॉक्रोज पार्टीचे (Cockroach Janta Party) संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांनी उपोषण करण्याची घोषणा केली आहे. तर आता त्यांच्यावर देखील शाईफेक करण्यात आल्याने जंतर मंतरवर एकच खळबळ उडाली आहे.

PM मोदींना देवाने सुद्बुद्धी घ्यावी; त्यांना लेकरु नाही, ना बायको नाही अन्…, अभिजीत दिपकेंच्या आई-वडीलांचा संताप

तर दुसरीकडे गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलानाची मोदी सरकारकडून कोणतीही दखल न घेतल्याने सोशल मीडियाव मोदी सरकारवर जोरदार टीका होता दिसत आहे. तर विरोधक देखील आता सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असून मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे, एमआयएमसह इतर राजकीय पक्षांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांच्या मागणीवर सरकारने विचार करुन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे.

Exit mobile version