Download App

उद्धव ठाकरे यांच्या कम ‘ऑन कील मी’ वर अमृता फडणवीसांचं उत्तर, नक्की काय म्हणाल्या?

यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या देवेंद्रजी हे योगीच आहेत. ते कधीच कसरत करत नाही. पण ध्यान धारणा करत असतात. आज 11 वा

  • Written By: Last Updated:

International Yoga Day  2025 : आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. (Yoga) त्यानिमित्ताने देशातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वारकरी, विद्यार्थी आणि पुणकेऱ्यांसोबत योगासनं केलं. तर दुसरीकडं फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईत योग दिवस साजार केला. यावेळी बोलता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या त्या वक्तव्यावरही उत्तर दिलं आहे.

यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या देवेंद्रजी हे योगीच आहेत. ते कधीच कसरत करत नाही. पण ध्यान धारणा करत असतात. आज 11 वा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्यांसोबत योग दिवस साजरा करत आहोत, असंही अमृता फडणवीस यांनी नमूद केलं. जागतिक योगदिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात वारकरी भक्तियोग उपक्रम झाला. पुण्यातली कॉलेजेसही यात सहभागी झाल्याने भव्य कार्यक्रम झाला.

शिवसेना संपवण्याचा भाजपाचा दुष्ट हेतू, फडणवीसांनी तर, भास्कर जाधवांचा घणाघात

प्राचीन संस्कृती, जीवन पद्धती, चिकित्सा पद्धती, ज्यात फक्त शरीराचा विचार केलेला नाही, मनाचाही विचार केला आहे. ती क्षमता योगात आहे. आज मोदीजींमुळे योगासनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. माणगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुका प्रशासन आणि तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमाला राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी शिबिरात सहभागी होत विविध योगासने प्रत्यक्ष करून दाखवत उपस्थितांना प्रेरणा दिली. या प्रसंगी तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस अधिकारी आणि इतर शासकीय कर्मचारीही उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. यावेळी बोलताना, अमृता फडणवीस म्हणाल्या, उद्धव ठाकरे जरी म्हणाले असले की कम ऑन कील मी, तरी राज्यात भाजप शांतताप्रिय पक्ष आहे. तुम्हाला कुणी मारायला येणार नाही असं त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

follow us