Download App

Video : खासदार म्हणून एक वर्षात सोलापूर जिल्ह्यासाठी काय केल; मोहिते पाटलांनी यादीच वाचली

खासदार झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी वर्षभरात असं कोणतं काम आहे ज्याच तुम्हाला समाधान वाटत असा प्रश्न विचारल्यानंतर

  • Written By: Last Updated:

Dhairyasheel Mohite Exclusive : माझ्या विरोधकांना पक्षात लॉबी तयार करण्यात आणि याची-त्याची उचलबांगडी करण्यात जास्त रस असल्याने आम्ही काय काम केलं हे पाहायला वेळच मिळाला नाही. त्यामुळेच ही सगळी मंडळी माझ्यावर मोकळ्यात टीका करतात. मात्र, मी निवडणुकीच्या वेळी यांना उत्तरं देईल. आत्ता यांना उत्तर देऊन माझा वेळ कशाला वाया घालवू असं म्हणत मोहिते (Mohite) पाटील यांनी वर्षभरात आपण सोलापूर  जिल्ह्यात काय कामं केली याचा उलगडा केला. खासदार धैर्यशील मोहिते यांनी लेट्सअप मराठीबरोबर संवाद साधला. त्यांना अनेक विषयांवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी बोलत केलं.

खासदार झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी वर्षभरात असं कोणतं काम आहे, ज्याच तुम्हाला समाधान वाटत असा प्रश्न विचारल्यानंतर मोहिते पाटील म्हणाले, केळी उत्पादनात एस्पोर्टमध्ये सोलापूर जिल्हा नव्हता. लोकांची सातत्याने मागणी होती की, केंद्राच्या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्याचं नाव असाव. तसंच, केळी संशोधन केंद्र सोलापूर येथे व्हावं अशीही मागणी होती. ती मागणी गेली अनेक दिवस होत असताना ती पूर्ण होत नव्हती. ती मी खासदार झाल्यावर वर्षभरात झाली अशी माहिती मोहिते पाटील यांनी यावेळी दिली.

Video : विरोधकांना मोहिते पाटील हलक्यात का घेतात? रणजितसिंहांना सोबत घेणार का?,

लोनंद, फलटण आणि पंढरपूर हा इंग्रजकालीन रेल्वेमार्ग आहे. या मार्गाविषयी देश स्वातंत्र्या झाल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पहिला प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू होते. ते आकलुजला आले होते. मात्र, त्यावेळी अचारसंहिंता असल्याने त्यांनी घोषणा केली नव्हती. त्यानंतर सर्वात प्रथम लोकसभेत मीच मुद्दा उपस्थित केला होता असंही माहिती मोहिते पाटील यांनी दिली. कदाचित पक्षात काही जमवाजमव करण्यात वेळ गेल्याने विरोधकांना हे दिसलं नसावं असा टोलाही मोहिते पाटील यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वीच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यामध्ये या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलावा अशी विनंती केल्याचंही मोहिते पाटील म्हणाले आहेत. तसंच, मी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशीही बोललेलो आहे. त्यासंदर्भातील लेखी कागदपत्रही माझ्याकडं आहेत असंही मोहिते पाटील म्हणालेत. त्याचबरोबर विरोधक मोकळ्यात माझ्यावर टीका करतात मात्र मी अशा लोकांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवत नाही. निवडणुकीच्यावेळी पाहून घेऊन असंही ते म्हणाले.

follow us