पक्षात येणाऱ्यांना विरोध नाही, पण संघर्ष… सत्यजित तांबेंच्या भाजपप्रवेशावर सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe On Styajeet Tambe entry in BJP : भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी थेट त्यावर उत्तर देत तांबेंच्या भाजप प्रवेशावर मैत्री आपल्या जागेवर अन् पक्ष त्याच्या जागेवर असतो. असं म्हणत एक प्रकारे तांबेंच्या प्रवेशाला पुर्ण विरामच दिला आहे.
काय म्हणाले सुजय विखे?
सुजय विखे यांना सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, मैत्री आपल्या जागेवर असते. शेवटी हा पक्षाचा निर्णय आहे. तो मुख्यमंत्री आणि प्रदेशाक्षांचा असतो. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर सर्व निर्णय मान्य करावे लागतात. मी देखील भाजपमध्ये आलो आहे. त्या काळात या गोष्टीला काही लोकांचा विरोध ही असेल पण पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य करावा लागतो. त्यामुळे जर कोणी पक्षात येत असेल तर त्याला मी विरोध करणार संयुक्तिक नाही कालांतराने जे काही होईल ते पाहायला मिळेलच.
पंतप्रधान म्हणून मोदींचा ११ वर्षांचा प्रवास, या काळातील महत्वाची कामगिरी काय?, वाचा सविस्तर
मात्र मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की, जेव्हा मतदार संघाने संगमनेर तालुक्यातील जनतेचा विषय येईल. त्यावेळी स्थानिक पातळीवरील राजकारण होतच राहणार. जनतेच्या हिताचे निर्णय घेणे आम्ही थांबवणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक राजकारण तसेच कार्यकर्त्यांमधील जो काही संघर्ष आहे तो कायम राहणार हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने जमवून आणतील? याची कल्पना नाही. कारण विधानसभेला मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन देखील अनेक ठिकाणी पक्षांतर्गत लोकांनी विरोधी काम केलं. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांपासून आम्ही जे काही राजकारण करत आलो आहोत ते होतच राहणार ते थांबणार नाही.
तांबेंकडून भाजपमध्ये जाण्याचे संकेत?
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक दिवसांपासून चर्चेत भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सत्यजित तांबे यांनी म्हटलं की, असं काही नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस याच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. ते ज्या प्रमाणे काम करतात. ताकद देतात. एक दुरदृष्टीचा नेता आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यात जी मजा येत आहे. त्यात जो आनंद मिळत आहे. तो माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे. त्यामुळे पुढील वाटचाल मी ते सांगतील तशा पद्धतीने करणार आहे.असं म्हणत जणू भाजपमध्ये जाण्याचे संकेतच दिले होते.