पंतप्रधान म्हणून मोदींचा ११ वर्षांचा प्रवास, या काळातील महत्वाची कामगिरी काय?, वाचा सविस्तर

पंतप्रधान म्हणून मोदींचा ११ वर्षांचा प्रवास, या काळातील महत्वाची कामगिरी काय?, वाचा सविस्तर

Modi 11 years as Prime Minister : नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पहिल्यांद्या देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्या दिवसाला आज ११ वर्ष पूर्ण झालं. (Modi) गुजरातमधून आपल्या राजकारणाला सुरूवात करून मोदी हे देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहचले.

आता फक्त POK वरच चर्चा, हक्काचं पाणी देणार नाही; PM मोदींची तोफ पाकिस्तानवर धडाडली

ज्या राज्यापासून त्यांनी राजकारणाची शिडी चढायला सुरुवात केली. त्याच राज्यात ते अनेक वर्ष मुख्यमंत्रीही होते. आज जेव्हा पंतप्रधान मोदी गुजरातमधील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत, तेव्हा हा केवळ एका नेत्याचा कार्यक्रम नाही तर ११ वर्षांपूर्वी दिल्लीपासून सुरू झालेल्या आणि आज जागतिक स्तरावर पोहोचलेल्या प्रवासाचे प्रतीक आहे. या प्रवासात केवळ टीका नाही तर प्रेमही मिळाले असंही ते म्हणाले.

दाहोदमध्येही ऑपरेशन सिंदूरसाठी माता आणि बहिणींनी आपलं बलिदानदिलं. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी काहीही केले तरी मोदी गप्प राहू शकतात का? जो कोणी हे करेल, मोदी त्याला नष्ट करतील. हे फक्त एक ऑपरेशन नाही. मोदींचा सामना करणे किती कठीण जाईल याची दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. कल्पना करा, एका वडिलांना त्याच्या मुलांसमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. आजही जेव्हा मी ते चित्र पाहतो तेव्हा माझे रक्त सळसळते असही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींची प्रमुख कामगिरी

जन धन योजना
स्वच्छ भारत अभियान
जीएसटीची अंमलबजावणी
आयुष्मान भारत योजना
डिजिटल इंडिया
पायाभूत सुविधांमध्ये भरभराट
आंतरराष्ट्रीय मान्यता
आत्मनिर्भर भारत मोहीम
महिला शक्ती आणि कायदा
तिहेरी तलाक कायदा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube