Video : विरोधकांना मोहिते पाटील हलक्यात का घेतात? रणजितसिंहांना सोबत घेणार का?,

Dhairyasheel Mohite Exclusive on Letsupp Marathi : जयकुमार गोरे हे रणजितसिंह निंबाळकर म्हणजे तुमचे विरोधक यांचे खास मित्र आहेत. त्यांची काही अडचण होते का? यावर बोलताना मोहिते म्हणाले, मैत्री वेगळी आहे, मंत्रीपद वेगळ आणि पालकमंत्री हे वेगळ आहे. त्यामुळ त्यांच्यासोबत काही काम करताना काही अडच आली नाही असं मत मोहित यांनी मांडलं आहे. तसंच, राम सातपुते हे राजकारणात नवीन आहेत. (Mohite) ते भावनेपोटी काही बोलत असतात असं म्हणत त्यांच्यावर फार बोलण मोहित यांनी यावेळी टाळलं. माढाचे खासदार धैर्यशील मोहिते यांनी लेट्सअप मराठीबरोबर संवाद साधला. त्यांना अनेक विषयांवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी बोलत केलं आहे.
कुणी काहीही टीका केली तरी मला काही फरक पडत नाही. तोच वेळ मी जनतेची काम करत राहील. असल्या लोकांसाठी वेळ वाया घालवायचा नाही असं म्हणत, विरोधकांना मोहिते यांनी हलक्यात घेतलं आहे. त्याचबरोबर दिल्लीत मन लागतय का? यावर बोलताना, आम्ही दिल्लीत रमलोय. तसंच, काही अडचण आली तर सुप्रिया ताई कायम सहकार्य करतात असं म्हणत सर्व सोप आहे असंही मोहिते पाटील म्हणाले आहेत. तसंच, ज्येष्ठ जे सदस्य आहेत त्यांची भाषण आवर्जुन ऐकतो असंही मोहिते पाटील म्हणाले आहेत.
Video : सरपंच जेव्हा खासदार होतो.. उमेदवारीला का झाला उशिर? ऐका काय म्हणाले म्हाढाचे खासदार
मी खवय्या असल्याने दिल्लीत मी अनेक ठिकाणी फिरत असतो. तसंच, अनेक खासदार मला विचारत असतात कुठ काय मिळत. त्याचबरोबर अनेक राज्यातील खाणं खात आहोत असंही ते म्हणाले. रणजित दादा मोहिते यांना फडणवीस यांनी भेट नाकारली ही खोटी बातमी आहे. त्यांचं काही लोकांना पित्त आहे. मात्र, त्याचा फरक पडत नाही. तसंच, मला कुणाचीच नाव घ्यायची नाहीत असं म्हणत त्यावर फारस भाष्य करण टाळलं आहे. तसंच, तुम्ही कुटुंबातील असल्याने एकमेकांना खेचणार का? यावर आम्ही राजकारण करणार नाही असंही ते म्हणाले आहेत.
रणजीत दादा यांचा फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या हिशोबाने ते काम करत आहेत. तसंच, जे काही घडेल ते वरिष्ठांच्या कानावर घालत आहेत त्यामुळं त्यांचे कष्ट सुरू आहेत. त्याला एक दिवस नक्की यश येईल असं म्हणत सुचक विधान त्यांनी केलं आहे. रणजित दादा यांना तुम्ही तुमच्या पक्षात खेचणार का? यावर बोलताना आम्ही तसा प्रयत्न करणार नाही असंही मोहिते पाटील म्हणाले आहेत. तसंच, आता कुणी कोणत्याही पक्षात असला तरी त्याने विकासाच्या आड येऊ नये असंही मोहिते पाटील म्हणालेत.