Iran Israel War Effect On Ch. Sambhajinagar Condom Manufacture : छत्रपती संभाजीनगर हे कंडोम निर्मितीचे जागतिक केंद्र मानले जाते, मात्र आखाती देशांमध्ये पेटलेले युद्धाचे भीषण पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर उमटू लागले आहेत. आखातातील युद्धामुळे येथील उद्योगाला सध्या कच्च्या मालाच्या टंचाईचा आणि वाढत्या दरांचा मोठा तडाखा बसला आहे. परिणामी, येत्या काळात कंडोमच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Viral Video : बी.टेक इंजिनिअरची बोलती बंद! महिना ७५ हजार कमवणाऱ्या रिक्षाचालकाची तुफान चर्चा
जगभरात 10 कोटी नगांचा पुरवठा
छ. संभाजीनगरमधील रेमंड लाईफस्टाईल, सेफगार्ड आणि युनिव्हर्सल यासह इतर मोठ्या कंपन्यांमधून दरवर्षी 10 कोटींहून अधिक कंडोम नगांची निर्मिती केली जाते. येथून भारतातील विविध राज्यात तसेच नेपाळ, आफ्रिकेसह जगभरातील 36 देशांमध्ये कंडोमचा पुरवठा होतो. मात्र, युद्धाने ही संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
कच्चा माल 45 टक्क्यांनी महागला
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहतूक खर्चिक आणि जोखमीची झाली असून, कंडोम उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमती 45 टक्क्यांनी महागल्या आहेत. पूर्वी 180 रुपये किलोने मिळणारे केमिकल आता 270 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय कंडोम निर्मितीसाठी लागणारे सिलिकॉन ऑइल, पॅकेजिंग मटेरियल आणि ॲल्युमिनियम लॅमिनेट यांचा पुरवठा खंडित झाला असून, कच्च्या मालाच्या किमती 40 ते 45 टक्क्यांनी वाढल्याने कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
बाजार ‘रॉकेट’ होईल या भ्रमात राहू नका! पुढचे ६ महिने अत्यंत कठीण; इन्वेस्टर्सने आता काय करावं?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
उत्पादनाच्या खर्चात झालेली मोठी वाढ भरून काढण्यासाठी कंपन्या आता कंडोमच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. कंडोमच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढल्यास त्याचा थेट परिणाम कुटुंब नियोजनाच्या साधनांच्या वापरावर होऊ शकतो, अशी भीती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ही अस्थिरता अशीच कायम राहिली, तर केवळ दर वाढणार नाहीत तर, उत्पादनातही मोठी घट होऊ शकते अशी भीती उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.
कसं बनलं कंडोम हब?
ऑटोहबप्रमाणे संभाजीनगर कंडोम हब कसं बनलं तर, भारतात कंडोमचे मुख्यत्वे 10 मोठे कारखान आहेत. यातील 4 महत्त्वाचे कारखाने एकट्या संभाजीनगरमध्येच आहेत. येथून जगभारातील 36 देशांमध्ये कंडोमचा पुरवठा केला जातो. कंडोमची निर्मिती रबरापासून होते. संभाजीनगरमध्ये बनणाऱ्या कंडोमसाठी लागणारे रबर हे केरळ आणि तामिळनाडूमधून आणले जाते. रबराच्या झाडापासून मुख्यतः लेटेक्सच्या स्वरूपामध्ये रबर काढले जाते. त्यानंतर हे रबर एका कंटेनरमध्ये भरून त्यावर प्रक्रिया सुरू केली जाते. यासाठी विविध केमिक्ल वापरली जातात. या प्रक्रियेतून लॅटेक्स तयार होतं. लेटेक्सच्या मशीनरीमध्ये पुढे जात आणि लेटेक्सला काचेच्या मोल्डसमध्ये बुडवून काढलं जातं. ज्यामुळे याला नळीसारखा योग्य आकार येतो. त्यानंतर आवश्यक तापमानात हीट केलं जातं आणि कंडोमची निर्मिती होते.
फ्लेवर्ड कंडोम कसं बनतं?
फ्लेवर्ड कंडोमच्या निर्मितीवेळी यात वेगवेगळे फ्लेवर्ड अॅड केले जातात. हे सर्व फ्लेवर्ड फूड ग्रेड फ्लेवर्ड असतात. या फ्लेवर्डसना सिलिकॉन ऑईलमध्ये मिक्स केलं जातं, त्यानंतर कंडोमवर त्याचे डोझिंग केलं जातं. संभाजीनगरमधून उत्पादित होणाऱ्या कंडोम उत्पादनामधून अंदाजे 200 ते 300 कोटींची उलाढाल होते.
