Download App

इस्रोची Aditya-L1 सूर्य मोहीम कशी असणार ? वाचा A टू Z माहिती

  • Written By: Last Updated:

Aditya-L1 Mission: भारताच्या जगप्रसिद्ध इस्रो संस्थेने चांद्रयानाच्या यशस्वी अभियानानंतर लगेच आदित्य-एल.1 (ADITYA-L 1) हे अभियान सूर्याकडे पाठवायचे आहे. ते 2 सप्टेंबर 2023 ला प्रक्षेपित करण्याची शक्यता. सहा वर्षे चालणाऱ्या ह्या मोहिमेत सात उपकरणे असून ती सूर्याच्या जडणघडणाचा, वातावरणाचा, गुरुत्वाचा, त्यावरील सौर वादळे, सौरवात यांचा अभ्यास करणार आहे. या मोहिमेमुळे पृथ्वीच्या वातावरणावर आणि यंत्रावर होणाऱ्या हानिकारक प्रभावाचा परिणाम कमी करण्यासाठी मोठा उपयोग होणार

आदित्य एल 1मोहीमः खरे तर या मोहिमेची संकल्पना 2008 मध्ये मांडली गेली होती.निधी मात्र 2019 मध्ये मिळाला. भारताच्यादृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची आणि महत्वाची ही सहा वर्षे सुरू राहणारी मोहीम जगात भारताची मान उंचावणारी ठरणार आहे. आज अमेरिका, युरोप आणि जपान या देशांनीच सूर्य मोहिमा केल्या आहेत. आता अशी सूर्य मोहीम करणारा भारत हा चौथा देश ठरेल. ह्या मोहीमेत इस्रोसोबत आयुका-पुणे आणि भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा यात सहभागी आहे. या मोहिमेत सात वैज्ञानिक उपकरणे आहेत. ते घेवून जायला आदित्य यानाला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर लँग्रेज पाँइटवर हालो ओर्बिटमध्ये स्थिर केल्या जाईल. हे अंतर पार करायला आदित्यला 3 महिने किंवा 109 दिवस लागतील.

Aditya-L1 : भारताच्या सूर्य मोहिमेची तारीख ठरली! आदित्य-एल1 2 सप्टेंबला होणार लाँच

सूर्याला 4.5 बिल्लीयन वर्षे झाली आहे. तो आपल्यापासून १५ कोटी किलोमीटर अंतरावर आहे. त्याचे गर्भातील तापमान 15 दशलक्ष डिग्री सेल्सियस तर बाहय आवरणाचे 5500 डिग्री सेल्सियस आहे.आपल्या जवळील अतिशय महत्वाचा आणि पृथ्वीवर जीवन देणारा आणि सतत परिणामकारक घटक आहे. पृथ्वीवर सूर्याचे वातावरणाचा,तापमानाचा आणि गुरुत्वाचा सतत परिणाम होत असतो. सौर ज्वाला (CME),सौर वाताचा (solar wind) पृथ्वीच्या वातावरणावर आणि हवामानावर, सजीव सृष्टीवर आणि इलेट्रिक, इलेक्ट्रोनिक्स उपकरणावर वाईट परिणाम होतो. जर सौर वादळांची,विकीरनांची आधीच माहिती मिळाली तर हे धोके कमी करता येईल, याचसोबत सूर्याच्या जडण घडणीचा अभ्यास करण्यासाठी ही सौर मोहीम आखल्या गेली आहे.


आदित्यची वैज्ञानिक उपकरणे-
आदित्य एल 1 ही एक सौर वेधशाळा आहे. त्यात सात वैज्ञानिक उपकरणे आहेत. त्यांचे एकूण वजन 244 किली असेल. सतीश धवन अवकाश केंद्रातून पी.एस.एल.व्ही.(PSLV) रॉकेट च्या माध्यमाने आदित्य यानाला अवकाशात सोडले जाणार आहे. ते ६ वर्षे तिथे प्रयोग करणार आहे .त्यात सात उपकरणे असतील त्यात 1 )VELC- व्हीझीबल एमिशन लाईन करोनाग्राफ 2) SUIT-सोलार अल्ट्राव्हायलेट इमेझिंग टेलेस्कोप 3) ASPEX-आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्सपेरीमेंट 4) PAPA-प्लाझ्मा अँनालायझर पकेज ऑफ आदित्य 5) Solexs-सोलर लो एनर्जी एक्स रे स्पेक्ट्रोमीटर 6) HEL105-हाय एनर्जी एल वन आँर्बिटीग एक्सरेस्पेक्ट्रोमीटर 4) मँग्नेटोमीटर अश्या सात उपकरणांचा समावेश आहे.

Chandrayan – 3 उतरलेल्या भागाला ‘शिवशक्ती’ पॉईंट हे नाव का देण्यात आले?

यातील पार्टिकल डीटेक्टर उपकरणांच्या माध्यमातून आदित्य सूर्याचे फोटोस्पियर,क्रोमोस्पियर आणि कोरोणाचा अभ्यास करेल तर 4 उपकरणाचे सतत लक्ष सूर्याकडे लागले असेल. आणि उर्वरित तीन उपकरणे तेथील पदार्थ,विकीरनांचा अभ्यास करेल. महत्वाचे म्हणजे आदित्य सूर्य कोरोनाचे तापने, कोरोनातील द्रव्याचे उत्सर्जन,सौर ज्वाळा -सौरवात,सौर वातावरणाचा प्रभाव , सूर्यमालेतील गुरुत्व आणि कणांचा प्रभाव इत्याची चा अभ्यास करणार आहे.


लँग्राज पाँइट ( lagrange point) L1.काय आहे
? या उपक्रमाला आदित्य L 1 असे का म्हटले आहे ह्याचे उत्तर म्हणजे- सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान अशी काही (L1 ते L5) एल 1 ते एल 5 स्थळे आहेत. जिथे सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा सँटेलाईटसारख्या वस्तूंवर शून्य प्रभाव पडतो किंवा असे स्थळ जिथे दोन्ही खगोलीय पिंडाच्या मध्ये एक गुरुत्वाची सीमा असते. त्या स्थळांना लँग्राज पोइंट( lagrange point) असे म्हणतात.ह्या स्थळी कोरिओलीस आणि सेंट्रीफुगल प्रभावामुळे उपग्रह स्वतंत्रपणे ह्या पोकळ भागात भ्रमण करू शकतात अश्या भ्रमणाला हालो ओर्बिट (Halo orbit )असे म्हणतात .आपले आदित्य L 1 ह्या अश्याच ठिकाणी पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर सतत विना अडथळा सूर्याकडे लक्ष ठेवून राहणार आहे. अमेरिकेचे सोहो हे सूर्ययान ह्याच L1 स्थळावर तर वेब अवकाश दुर्बीण L2 स्थळावर कार्य करीत आहेत.


मोहिमेतून काय साध्य होईल ?
सूर्याच्या प्रचंड गुरुत्व आणि तापमानामुळे सौरमालेत अवकाशीय हवामान (Space weather) तयार झाले आहे. सूर्यावर सतत विस्फोट होऊन त्यातून सौर पदार्थ (CME) , सौरज्वाळा (flare) , विकीरने (radiation) आणि सौरवात(wind) पृथ्वीकडे येत असते .ह्यामुळे पृथ्वीच्या वातावरण आणि हवामानावर खूप मोठे विपरीत परिणाम होत असतात. एवढेच नव्हे तर पृथ्वीवरील उपग्रह, संवाद उपकरणे ,इलेक्ट्रीक साधने आणि इलेक्ट्रोनिक्स उपकरणे बंद किंवा खराब होत असतात. ह्या सर्व धोक्यांना टाळायचे असेल किंवा आधीच माहिती करून घ्यावयाची असेल तर सूर्याची जडण-घडणाची माहिती करावी लागते म्हणूनच सूर्याचा अभ्यास करण्यासाठी उपग्रहांची गरज भासते. ह्या मोहिमेतून आपणास सूर्यातील पदार्थ, गुरुत्व ,तापमान त्यातून निघणारी किरणे ,ज्वाळा,वायू इत्यादी अनेक विषयाचा अभ्यास केला जाणार आहे.या अभ्यासचा देशाला वैज्ञानिक आणि हवामानाच्या अभ्यासाच्यादृष्टीने खूप फायदा होणार आहे.

लेखक-प्रा. सुरेश चोपणे, खगोल अभ्यासक,अध्यक्ष- स्काय वॉच ग्रुप, (आजीव सदस्य- इंडियन सायन्स काँग्रेस-कोलकाता, मराठी विज्ञान परिषद- मुंबई, विज्ञान लेखक संघटना-मुंबई,हौशी खगोल संघटना-दिल्ली)

Tags

follow us