Download App

आता रुग्णालयाच्या खर्चाची चिंता नाही, अ‍ॅडमिट झाल्यानंतर दररोज मिळणार पैसे, काय आहे हॉस्पिटल डेली कॅश स्कीम ?

एसबीआय जनरल इन्शुरन्सने Starfin India सहकार्याने हॉस्पिटल डेली कॅश स्कीम (Hospital Daily Cash Scheme) नावाची एक विशेष योजना सुरू केली

  • Written By: Last Updated:

Hospital Daily Cash Scheme : दिवसेंदिवस वैद्यकीय खर्चा कमालीची वाढ होत आहे. जुन्या आरोग्य विमा पॉलिसी (Health insurance policy) आता लोकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे एसबीआय जनरल इन्शुरन्सने (SBI General Insurance) Starfin India सहकार्याने हॉस्पिटल डेली कॅश स्कीम (Hospital Daily Cash Scheme) नावाची एक विशेष योजना सुरू केली आहे. ही योजना विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी तयार करण्यात आली आहे.

भाजपला धक्का, आमदार टी.राजा यांनी दिला राजीनामा; कारण काय? 

एसबीआय जनरल इन्शुरन्सने ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांसाठी तयार केली आहे. आजच्या काळात वैद्यकीय खर्च इतका वाढला आहे की सामान्य कुटुंबाला रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च उचलणे कठीण झालंय. अशा परिस्थितीत, ही योजना कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी एक मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीला आजार किंवा अपघातामुळे रुग्णालयात दाखल केले गेले तर त्याला दररोज एक निश्चित रक्कम दिली जाईल. ही रक्कम वैद्यकीय खर्चांसाठी तसेच इतर गैर-वैद्यकीय खर्चांसाठी जसे की प्रवासाचा खर्च, घराचा खर्च इत्यादींसाठी वापरली जाऊ शकते.

‘ही लढाई संपलेली नाही, हा विजय नाही…’; हिंदीसक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर हेमंत ढोमेची पोस्ट 

मुख्य वैशिष्ट्ये:
दैनिक रोख लाभ: तुम्हाला रुग्णालयात दाखल झाल्यावर दररोज ठराविक रक्कम (उदा. रु 2,000 ते रु 4,000) मिळते.

18 ते 65 वर्षांपर्यंतचे लोक ही योजना खरेदी करू शकतात.

तुमच्या गरजेनुसार 30 दिवसांची किंवा 60 दिवसांची योजना निवडता येते.

आयकर कायद्याच्या कलम 80D नुसार, या योजनेवर कर लाभ मिळू शकतो.
यासोबतच, या योजनेत अपघाती मृत्यू आणि आंशिक अपंगत्वाचे कव्हर देखील समाविष्ट आहे. म्हणजेच, जर कोणतीही दुर्दैवी घटना घडली तर पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील मिळेल.

तुमच्या गरजेनुसार निवडू शकता

कव्हरही योजना आणखी सोयीस्कर करण्यासाठी, स्टारफिन इंडियाने त्यांच्या तंत्रज्ञान-आधारित प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे, ग्राहक त्यांच्या गरजेनुसार कव्हर सहजपणे निवडू शकतात. ग्राहकांना फक्त त्यांची आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर लगेच एक कव्हर नोट जारी केली जाते. यानंतर, निर्धारित वेळेत एसबीआय जनरल इन्शुरन्सकडून विम्याचे अंतिम प्रमाणपत्र देखील प्राप्त होते.

दाव्याची प्रक्रिया देखील खूप सोपी

जर पॉलिसीधारकाला दावा करायचा असेल तर तो स्टारफिन इंडियाच्या दाव्याच्या अॅप किंवा वेब पोर्टलद्वारे सहजपणे दावा दाखल करू शकतो. दावा दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात, त्यानंतर ३० दिवसांच्या आत दावा निकाली काढला जातो. ही प्रक्रिया इतकी पारदर्शक आणि जलद आहे की ग्राहकांना जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही.

ही योजना सुरू करून एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि स्टारफिन इंडियाने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे.

 

 

 

 

follow us