चुकीचा सॅनिटरी पॅड वापरताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम

sanitary pad महिलांच्या आरोग्याबाबत मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते

Sanitary Pad

Using the wrong sanitary pad? Can have serious health consequences : महिलांच्या आरोग्याबाबत मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. पाळीच्या दिवसांत योग्य सॅनिटरी पॅडचा योग्य वापर न केल्यास विविध आणि गंभीर आरोग्याच्या समस्या उद्धभवू शकतात. त्यामुळे त्यामुळे योग्य पॅडची निवड, वेळोवेळी बदल आणि स्वच्छतेचे नियम पाळणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊ योग्य सॅनिटरी पॅड न वापरल्यास नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच योग्य सॅनिटरी पॅड कोणता?

NEET Exam Paper leak : आता पेपर फुटूच शकत नाही…प्रश्नपत्रिकेच्या संरक्षणाची जबाबदारी सैन्याकडे?

योग्य सॅनिटरी पॅडचा योग्य वापर केल्यास केवळ आरामदायी अनुभव मिळत नाही, तर संसर्ग, त्वचेची खाज, जळजळ आणि दुर्गंधी यांसारख्या समस्यांपासूनही संरक्षण मिळते. अनेक महिला दीर्घकाळ एकच पॅड वापरणे किंवा चुकीच्या प्रकारचे पॅड निवडणे यामुळे त्रास सहन करतात.

‘tukaram_ias’ इंस्टाग्राम अकाउंटवर पाठवा माहिती; भेसळखोरांवर होणार थेट कारवाई

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅड नियमितपणे बदलणे. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक ४ ते ६ तासांनी पॅड बदलणे आवश्यक असते. खूप वेळ एकच पॅड वापरल्यास बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. तसेच त्वचेवर लालसरपणा, जळजळ आणि खाज निर्माण होण्याची शक्यता असते. वेळेवर पॅड बदलल्याने त्वचा सुरक्षित राहते आणि दुर्गंधीची समस्या टाळता येते.

‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली! तांत्रिक बिघाडामुळे मोठा निर्णय

पॅड खरेदी करताना त्याच्या मटेरिअलकडे विशेष लक्ष द्या. कॉटनपासून बनवलेले आणि हवा खेळती राहील असे पॅड त्वचेसाठी अधिक सुरक्षित मानले जातात. स्वस्त किंवा रसायनयुक्त पॅड त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे नेहमी दर्जेदार आणि त्वचेला अनुकूल पॅडची निवड करावी. दिवस आणि रात्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पॅड वापरणेही महत्त्वाचे आहे. दिवसा हलके आणि पातळ पॅड आरामदायक ठरतात, तर रात्री लांब आणि जाड पॅड अधिक सुरक्षितता देतात. यामुळे रक्तस्राव बाहेर येण्याचा धोका कमी होतो.

सावरकर, टीकाकारांना कळले नाही अन् त्यांच्या नावाने मतं मागणाऱ्यांनी तरी वाचले का? राज ठाकरेंचा परखड सवाल

पॅड बदलताना हात स्वच्छ धुणे, वापरलेले पॅड व्यवस्थित पिशवीत बांधून टाकणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर योग्य काळजी घेतल्यानंतरही सतत खाज, जळजळ किंवा असामान्य दुर्गंधी जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे एखाद्या संसर्गाचे किंवा इतर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.

follow us