अख्खं कुटुंबचं संपलं! परभणीत टँकची सफाई करताना पाच जणांचा मृत्यू; मदत जाहीर

  • Written By: Published:
अख्खं कुटुंबचं संपलं! परभणीत टँकची सफाई करताना पाच जणांचा मृत्यू; मदत जाहीर

Five People Died In Parbhani : परभणीच्या सोनपेट तालुक्यातील भाऊंचा तांडा येथे सेफ्टी टँकची स्वच्छता करताना एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले असून एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

‘तो’ निर्णय घ्यावाच लागणार, नाहीतर त्यांना कळेल… राऊतांनी भरला दम

नेमकं काय घडलं?
परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊंचा तांडा येथे एका फार्महाऊसमध्ये असलेल्या सेप्टिक टॅंकच्या सफाईदरम्यान हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे मृतांमध्ये एकाच कुटुंबांतील सदस्यांचा समावेश आहे. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली. भाऊचा तांडा येथील विठ्ठल मारोती राठोड यांच्या फार्म हाऊसवर गुरुवारी दुपारपासून काही जण सेप्टिक टॅंक स्वच्छ करत होते. त्यावेळी रात्री आठच्या सुमारास टँकमध्ये काहीजण बेशुद्ध पडल्याचे लक्षात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला होता.

Sanjay Raut : त्यांनी वकिली केली, पण कायद्याची पुस्तकं पुन्हा चाळायला हवी, राऊतांचा फडणवीसांना टोला

मुख्यमंत्र्यांकडून शोक आणि मदत जाहीर
दरम्यान, या दुदैवी घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोक व्यक्त केला आहे. तसेच सोनपेठ घटनेतील मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर केली आहे. मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

https://letsupp.com/entertainment/kubbra-sait-sepaks-about-doing-sex-scene-with-nawazuddin-siddiqui-in-sacred-games-46007.html

काल रात्री ९ च्या सुमारास भाऊचा तांडा येथील शेत वस्तीवरील एका घरातील सेप्टिक टॅंक मधील मैला सफाई करताना पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. एका कामगारास गंभीर अवस्थेमध्ये अंबजोगाई येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती होताच त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube