‘तो’ निर्णय घ्यावाच लागणार, नाहीतर त्यांना कळेल… राऊतांनी भरला दम

‘तो’ निर्णय घ्यावाच लागणार, नाहीतर त्यांना कळेल… राऊतांनी भरला दम

Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले. या निकालावर आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली.

राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत न्यायालयाच्या या निकालावर भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. आम्ही सत्ता सोडली. नंतर राजकारण झाले. त्यात आमचे काय चुकले. पण आताचे सरकार बेकायदेशीर आहे. न्यायालयानेही त्यांना बेकायदेशीर ठरवले आहे.

शिंदे-फडणवीस सरकार फक्त तीन महिने, जावं तर लागणारच; राऊतांचा घणाघात

सरकार बेकायदेशीर, अपात्र ठरवले आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निकालात म्हटले आहे. म्हणजे आता अध्यक्षांना 90 दिवसांत त्यांना निर्णय घ्यावा लागेल. निर्णय घेतला नाही तर त्यांना कळेल महाराष्ट्र काय आहे, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा राजकीय इतिहास तपासून पहा. त्यांनी अनेक पक्ष बदलले, आचार विचार नाही आणि ते त्या पदावर असतांना बोलता येत नाही. सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निकालानंतर त्यांना आता आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागणार असल्याचे राऊत म्हणाले.

सरकारचा अंत जवळ आला आहे. अधिकाऱ्यांनी सरकारचे आदेश पाळू नयेत. आदेश पाळले तर अडचणीत येताल. सर्व आदेश बेकायदेशीर आहेत. आमचा लढा अंतिम टप्प्यात आहे. या सरकारचे तीन महिने बाकी आहेत. या सरकारला जावच लागणार आहे. यात अडथळे आणले तर पंतप्रधान मोदी अडचणीत येतील, असे राऊत म्हणाले.

Video : अखेर अजितदादांनी वचपा काढलाचं; म्हणाले, इथं रडण्यापेक्षा…

आदेश पाळू नका

2014 पासून नैतिकता आणि संस्कार हे भाजपने संपविले आता काय नैतिकतेचा मुद्दा घेऊन बसलात. २०१९ ला आम्ही काय केलं यावर बोलण्याचा अधिकार नाही. देशात अराजकता माजेल, पोलिसांनी आणि प्रशासनाने बेकायदा आदेश पाळू नयेत, असे राऊत म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube