Download App

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा; मंदीर समितीचे अधिकारी राजेंद्र शेळके काय म्हणाले?

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पूजेवेळी 30 ते 35 मराठी कुटुंब होते.

  • Written By: Last Updated:

Pandharpur Vitthal Temple : पंढरपुरातून मोठी माहिती समोर आली आहे. (Pandharpur) मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात चक्क हिंदीतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जातोय. आता थेट मंदिरात हिंदीतून पूजा झाल्याचे समोर आल्यानंतर वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पूजेवेळी 30 ते 35 मराठी कुटुंब होते. मात्र, फक्त एका कुटुंबासाठी हिंदी भाषेत पूजा करण्यात आली, असा दावा राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीने एक्स या समाजमाध्यमाद्वारे केला आहे. हा दावा करताना सातपुते यांनी मोठी पोस्ट लिहिली असून मी हे प्रकरण लावून धरणार असल्याचंही त्यांनी त्यामध्ये म्हटलं आहे.

हिंदी भाषा सक्ती प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांना कायदेशीर नोटीस, ७ दिवसात उत्तर न दिल्यास

राहुल सातपुते यांनी पंढरपूर मंदीर समितीकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे. या तक्रारीला मंदीर समितीने प्रतिसाद दिला आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. चौकशी करून आम्ही योग्य ती कारवाई करू, असं या मंदीर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच, यापुढे मंदिरात मराठी भाषेतूनच पूजा केली जाईल, अशी माहिती पंढरपूर मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची तुळशीपूजा होती. त्याचे सर्व स्त्रोत हे संस्कृत भाषेत असतात. मात्र, तुळशीपूजा सुरू करण्यापूर्वी त्याची माहिती ही मराठी भाषेतून सांगितली जाते. परंतु, 9 ऑगस्ट रोजी एक अमराठी कुटुंब आले होते. त्या कुटुंबाला आम्हाला याबाबतची माहिती हिंदी भाषेतून दिली जाईल का? अशी विचारणा केली होती. आपल्याकडे सर्व पूजा मराठीतूनच होतात. आपण हिंदी भाषेतून कुठलीही पूजा करत नाही. भाविकाला मराठी समजत नसल्यामुळे आपण फक्त पूजेची माहिती हिंदीतून दिली, असे राजेंद्र शेळके यांनी सांगितलं.

follow us