…. तर राज ठाकरेंच्या थेट मुसक्याच आवळा; दादा भुसेंना नामी संधी सांगत सदावर्तेंनी दंड थोपटले

…. तर राज ठाकरेंच्या थेट मुसक्याच आवळा; दादा भुसेंना नामी संधी सांगत सदावर्तेंनी दंड थोपटले

Gunaratna Sadavarte Criticized Raj Thackeray Against Hindi : हिंदी सक्तीला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मुसक्या आवळा, असं आवाहन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी (Gunaratna Sadavarte)केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना नामी संधी असल्याचा देखील उल्लेख केलाय. अजित पवार एक डोळस मंत्री असल्याचं देखील सदावर्ते यांनी (Hindi Language Compulsory) म्हटलंय.

राज्यात सध्या हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. हा अविचारीपणा आहे. तारतम्य सोडून वागणं आहे. सुसंस्कृतवृत्ती नाही. राज ठाकरे कोण आहे? जो विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण करत आहे. राज ठाकरे एक सामान्य हिंदू माणूस आहे. शिक्षणाच्या आड (Raj Thackeray Against Hindi) येणे अक्षम्य आहे. हे नही चलेगा, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.

जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा, किती हास्यास्पद…; प्रश्नांची सरबत्ती करत भाजप नेत्यानं ठाकरेंना घेरलं

दादा भुसेंना मोठी संधी

गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार. भारतीय संविधानानुसार सगळे समान आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. जरांगेला मोर्चा आणण्यास मज्जाव करण्यात आला, तसंच आम्ही पत्र दिलंय की, तातडीने यांना पावबंद करा. मोर्चाचं धोरण अघटित आहे. भाषेच्या नावावर वाद निर्माण करण्याची भानगड आहे. राज ठाकरेंवर प्रतिबंधित कारवाई झाली, कायद्याप्रमाणे मुसक्या आवळल्या पाहिजेत, अशी विनंती वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाला केली आहे.

दादा भुसे, आपण सन्मानीय मंत्री आहे. मंत्री झाले किती, विसरले किती. पण तुम्हाला अजरामर व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. तुमच्या हाती त्रैभासिक भाषेचा निर्णय झालाय. तुम्ही अजरामर मंत्री होणार आहेत. योजना येतात, जातात..पण ज्ञानार्जनाच्या क्षेत्रात हे हजारो वर्ष चालू राहणार आहेत. कोण राज ठाकरे, हे नाही करायचं, हे नाही शिकायचं, अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे.

Thackeray is brand! एकच अन् एकत्रित मोर्चा… संजय राऊतांच्या ट्विटने खळबळ

शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना इशारा…

कसलं ढोंग आहे? मराठीला कोणी विरोध केलाय, कोणी टाच मारली आहे. देवेंद्रजींच्या काळात पंतप्रधान मोदींनी मराठी अभिजात भाषेचा दर्जा केलाय. पुस्तकं जाळतात, आई सरस्वती असते. त्यांचे कार्यकर्ते पुस्तकं कशी जाळू शकतात? पुस्तकाचं काय महत्व, असे सवाल देखील सदावर्ते यांनी केले आहेत. राज ठाकरे नाही, इथे विचार चालतात. शिक्षणाच्या आड येवू नका, असा इशारा त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube