Download App

कायदा लोकांच्या विरोधात राबवणार आपलं सरकार नाही, शिंदेचा ठाकरेंना टोला

  • Written By: Last Updated:

सहकार विभागवरती ज्या केसेस आहेत त्यावरती थेट गुन्हे दाखल न करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे सरकार कायदा लोकांच्या हितासाठी राबवणार सरकार आहे हे कायदा लोकांच्या विरोधात राबवणार सरकार नाही. असा टोला यावेळी शिंदेंनी ठाकरेंना लागलेला ते आज मुबंईत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदे बोलत होते.

येत्या काळात राज्यासह मुबईचा विकास झपाट्याने आमचं सरकार करणार आहे, तसेच येत्या 2 वर्षात मुबई खडेमुक्त केली जाईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. आमचं सरकार हे राज्यातील जनतेच्या हिताचं सरकार आहे. मी मागील महिन्यातच आमच्या राज्यासाठी प्रदेशातून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कामे आणली आहेत. ते लवकरच तुम्हाला दिसेल.

गृहनिर्माण सोसायट्यांसाठी गुडन्यूज! फडणवीसांनी दिलं ‘हे’ मोठं गिफ्ट

यावेळी त्यांनी मुंबईतील आगामी निवडणुका व ठाकरे गटाची भूमिका यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, काही लोकांना निवडणुका आल्या की मुंबईकर आठवतात. मुंबईचे विषय आठवतात. मात्र आम्ही सत्तेत आल्यापासून मुंबईच्या प्रमुख विषयांना प्राधान्य दिले. तसेच रखडलेले प्रश्न कसे मार्गी लागतील या गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित केले.

मुनगंटीवारांना त्यांच्या पक्षातही कुणी विचारत नाही; ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार

मुंबईमधील अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडलेले आहे. यामुळे नागरिक मुंबईबाहेर जाऊ लागले आहे. यामुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागले पाहिजे अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. मुंबई सुशोभीकरण, आरोग्याचे प्रश्न हे देखील कसे मार्गी लागतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे.

Tags

follow us