मी अजितदादांच्या अपघाती निधनावर बोलतो त्याला माझ्या पक्षातील लोकांचा विरोध…, मिटकरींचा रोख कुणाकडं?

आज एक महिना झाला असला तरी अजूनही वाटतं सभागृहात अजित पवार येतील. आमच्याशी चर्चा करतील.

News Photo   2026 02 28T145135.745

मी अजितदादांच्या अपघाती निधनावर बोलतो त्याला माझ्या पक्षा लोकांचा विरोध..., मिटकरींचा रोख कुणाकडं?

अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना झाला. मात्र, कुठल्याच प्रश्नांची उत्तर मिळाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajitpawar) गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांचा अपघात की घातपात याची उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहणार, असंही मिटकरींनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

त्याचबरोबर रोहित पवारांसोबत मी आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांसोबत मी आहे. कुठल्याही पक्षाचा आमदार आमच्यासोबत असला तर त्यालाही सोबत घेणार, असं अमोल मिटकरी म्हणाले. मला आमच्याच पक्षातले नेते बोलताय, तुम्ही का प्रश्न विचारताय? तुम्ही अजित पवारांच्या अपघातावर का जास्त बोलताय? मला माहिती नाही ते असं का बोलत आहेत. पण मला जे योग्य वाटतं ते मी करतोय, असं अमोल मिटकरींनी यावेळी स्पष्ट केलं.

थोडं सांभाळून वागा, आमदार रोहित पवारांचा या चार नेत्यांना इशारा

माझ्या पक्षातले काहीजण माझ्यासोबत प्रश्न उपस्थित करतात. आता बाकीचे का प्रश्न उपस्थित करत नाहीत? हे मी सांगू शकत नाही. राजकीय दृष्टिकोनातून जर रोहित पवार आमच्या पक्षाबद्दल बोलत असेल तर मी त्याला उत्तर देणार नाही. मी फक्त अजित पवारांच्या अपघाताबद्दल जर ते प्रश्न विचारत असेल तर त्यांच्यासोबत मी असेल, असंही अमोल मिटकरींनी सांगितले. अधिवेशन सुरू असताना आणि मागच्या महिन्याभरात एक दिवस असा गेला नाही अजित पवारांची आठवण आली नाही.

आज एक महिना झाला असला तरी अजूनही वाटतं सभागृहात अजित पवार येतील. आमच्याशी चर्चा करतील. देवगिरीला बैठकीला आमच्या सगळ्या आमदारांना बोलवतील, पण आता अजित पवार आमच्यात नाहीत, असं म्हणत अमोल मिटकरी भावूक झाले. अजित दादांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांना दु:ख आहे, अजितदाद नाहीत ही कल्पना करता येत नाही असंही ते म्हणाले.

Exit mobile version