Download App

रावणाला शिवधनुष्य पेललं नाही, यांना काय पेलवणार? भास्कर जाधवांची अयोध्यावारीवर टीका

  • Written By: Last Updated:

धनुष्यबाण रामच्या हाती देखील होत आणि रावणाच्या हातात देखील होता. रावण बलाढ्य होता, दहा तोंडाचा, वीस हाताचा होता. पण त्याला ते शिवधनुष्य बाण पेलला नाही, यांना (एकनाथ शिंदे गट) काय पेलणार ? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी विचारला आहे. ठाणे येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tours) गेले आहेत. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे.

राजकारण कसं असतं? पंकजा मुंडेंनी मनमोकळेपणाने सांगितलं…

यावेळी भास्कर जाधव यांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज ही मंडळी तिकडे गेले आहेत, त्यांचा दौरा असा दाखवला जात आहे की पहिल्यांदा अयोध्येमध्ये कोणी तरी गेलं आहे. ते पुढे म्हणाले की, ते तुमच्यावर संकट आणतील, पण तुमच्यावर कितीही संकट आली तरी राम त्यांच्या बाजूने नाही तर तुमच्या बाजूने आहे.

खडकावरही विचार उगवून येतील

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे ज्वलंत विचार आहेत. त्यामुळे ते विचारातून खडकावर जरी बियाणे टाकलं तरी ते खडकावर, काताळावरही उगवुन येतील, असं ते म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्यारून चांगलचं फटकारलं आहे. महत्व कशाल द्यायचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की, अयोध्येला? त्यांची श्रध्दा अयोध्येत असेल तर आमची श्रध्दा ही शेतकऱ्यांमध्ये आहे, असं शरद पवार म्हणाले होते. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांचं वागणं म्हणजे, मूह में राम, बगल मे छुरी आहे, असं त्यांनी सांगितलं.

Tags

follow us