राजकारण कसं असतं? पंकजा मुंडेंनी मनमोकळेपणाने सांगितलं…

Pankja Munde अहमदनगर शहरातून विधानसभा लढवणार? भाजप पदधिकाऱ्यांचं अमित शाहंना पत्र

राजकारण खूप निर्दयी असतं, असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. परळीतल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी अगदी मनमोकळंपणाने भाषण केल्याचं दिसून आलं आहे.

Gautami Patil : सगळं काही असूनही खूश नाही…गौतमी पाटील असं का म्हणाली?

पंकजा मुंडे यांना एका कार्यकर्त्याने कार्यक्रमाला बोलविले असता त्यांनी मनमोकळं भाषणं केलंय. यावेळी मुंडे म्हणाल्या, आज मला कार्यक्रमाला येण्यासाठी खूप अडचणी आल्या आहेत.

घराणेशाहीबद्दल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणतात…

दोन ते तीन दिवसांपासून दिल्लीत कामात व्यस्त होते. त्यानंतर दिल्लीहुन थेट परळी गाठलं आहे. परळीत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून उजवा मारत लगेच कार्यक्रमात पोहचले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.

एखादा राजकीय कार्यक्रम हुकला तरी चालतो पण कार्यकर्त्याचा कार्यक्रम हुकता कामा नये, असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. तसेच राजकारण खूप निर्दयी असतं, माणसाला वैयक्तिक गोष्टी जपता येत नाहीत, घरात कोणी आजारी असेल तरीही जाव लागतं दुख: असलं तरी हसावं लागतं, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या एका बंधूच्या कार्यक्रमासाठी मुंडे यांनी थेट दिल्लीहुन परळी गाठली होती. यावेळी अनेक अडचणी आल्या मात्र, पंकजा मुंडेंना कार्यक्रमाला हजेरी लावायची होती, असं त्यांनी सांगितलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube