Download App

Jalna Maratha Protest : मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं…

Jalna Maratha Protest : मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्जची घटना घडल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया केव्हाच सुरु झाली असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

Maratha Andolan : ‘मी तुमच्यासोबत, काळजी करू नका’; राज ठाकरेंचा फोनवरून जरांगेंना शब्द

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही आरक्षण देतोयं हे दाखवण्यासाठी आम्ही काही करत नाही, मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून लाठीचार्जची घटना दुर्देवी आहे, आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा शब्दच एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; CM शिंदेंचा मराठा समाजाला शब्द

तसेच मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायंच? हे मी आत्ता सांगत नाही, नाहीतर त्याच्यामध्येही विरोधक काड्या करण्याचं काम करतील, मनोज जरांगे पाटील यांच्याशी मी तीन दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, मी विनंती केली तु अॅडमिट हो, पण दुर्देवाने न व्हावी ती घटना घडली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Masoom 2: प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूरने केला मोठा खुलासा; म्हणाला, “अवघ्या ३० सेकंदात…

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून राजकारण केलं जात आहे, जालन्यात मराठा आरक्षासाठी आंदोलकांचं शांततेत आंदोलन सुरु होतं, पण आंदोलनात दगडफेक कोणी केली हे पाहावं लागणार आहे, काही समाजकंटक जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहचलीयं, विरोधक या मुद्द्यावरुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे.

Ahmednagar Crime : रस्तालूट करणारे चार सराईत गुन्हेगार अटकेत; नगर पोलिसांची कारवाई

मराठी समाज संयमी असून सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द झालं तरीही शिंदे-फडणवीस सरकारने साडेतीन हजार तरुणांना नियुक्त्या देण्याचं काम केलं आहे कारण मी एका सर्वसामान्य कुटुंबातील गरीब मराठा आहे, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राची सेवा करत राहीन, असा शब्दच मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिला आहे.

या प्रकरणी जालन्याचे पोलिस अधीक्षकांसह उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं असून अ्ॅडिश्नल डिजी सक्सेना या घटनेची चौकशी करणार आहे, या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नसून वेळ पडल्यास आम्ही न्यायालयीन चौकशी करणार असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेतून मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं जात असून त्यांना बळी पडू नका, असं आवाहनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं आहे.

Tags

follow us