Download App

Jalna Maratha Protest : ‘काही नेते वेळेवर पोहोचून सर्व गोष्टी..,’; एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा…

Jalna Maratha Protest : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि आमदार रोहित पवारांनी तत्काळ आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या भेटीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शरद पवारांवर ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळालयं. काही नेते वेळेवर पोहोचून काही गोष्टी करत असल्याचा गंभीर आरोपच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. नूकतीच मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला.

Jawan: किंग खानच्या ‘जवान’मधील डायलॉगवरुन नवा वाद पेटला; करणी सेनेने दाखल केली तक्रार

लाठीचार्जची घटना घडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी तत्काळा जखमी आंदोलकांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आंदोलकांशी चर्चा करुन शांततेच्या मार्गाने संघर्ष करण्याचं आवाहन पवार यांनी आंदोलकांना केलं होतं. त्यावरुन आता मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

चांद्रयान-3 मोहिमेच्या काउंटडाउनचा आवाज थांबला, इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन

मुख्यमंत्री म्हणाले, काही लोकं समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहेत की नाही, हे माध्यमांनी शोधावं, काही नेते बरोबर वेळेवर पोहोचताच सगळ्या गोष्टी करतात, घटना घडल्यानंतर काही लोकं रात्री अडीच वाजता पोहोचतात, त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही, शरद पवारही राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत, ते मोठे नेते असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

‘आम्ही दिल्लीत मुजरे करायला नाहीतर…,’; विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचं खोचक प्रत्युत्तर

जालन्यातल्या लाठीचार्ज घटनेवर कोणीही राजकीय पोळी भाजून नये, राज्यात सर्वधर्माचे लोकं राहतात, आमचं सरकार आल्यापासून काही नेत्यांना हे सरकार नको आहे, त्यामुळे काही ना काही आरोप करुन सरकारला बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर केला आहे.

Silvina Luna Passed Away: प्लास्टिक सर्जरी जीवावर बेतली, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

दरम्यान, हा विषय मराठा समाजाचा असून राज्यात शांतता नांदली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करुन मराठा समाजाला न्याय मिळून द्यावा, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठा आरक्षणावर सरकार गांभीर्याने काम करीत असून आम्ही आरक्षण देणारचं आहोत, मराठा समाजाने थोडा संयम ठेवावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

तसेच जालन्याच्या घटनेआधी मी स्वत: मनोज जरांगेगंसोबत बोललो होतो. या आंदोलनावर सरकार काम करत असल्याचं मी सांगितलं होतं, पण दुर्देवाने ही घटना घडली. या घटनेप्रकरणात राज्यात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरु असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे.

Tags

follow us