Download App

CM शिंदेंचा DND मोड अ‍ॅक्टिव्ह; काश्मीरमध्ये सहकुटुंब 3 दिवसांच्या सु्ट्टीवर

CM Eknath Shinde :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवघ्या 3 महिन्यातच पुन्हा सुट्टीवर गेले आहेत. एप्रिलमध्ये 3 दिवस सुट्टी घेऊन परल्यानंतर गुरूवारी (8 जून) पुन्हा एकदा 3 दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यांनी गुरूवारी वैष्णवदेवीचे दर्शन घेतले. यावेळी श्राइन बोर्ड प्रशासनाने एकनाथ शिंदे यांचा सत्कार करुन आदरातिथ्य केलं. तिथून सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते माँ वैष्णवदेवी भवन येथून हेलिपॅडवर पोहोचले आणि एका विशेष हेलिकॉप्टरने जम्मूला रवाना झाले.

शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस ते जम्मू-काश्मीरमध्ये असणार आहेत. या देवदर्शन आणि पर्यटनाबरोबर ते काश्मीरमधील अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

PM मोदींचे OSD झाले देशाच्या अर्थमंत्र्यांचे जावई; चर्चा मात्र सीतारामन कुटुंबीयांच्या साधेपणाची!

यापूर्वीही एप्रिल महिन्यात एकनाथ शिंदे 3 दिवस सुट्टीसाठी आपल्या मूळगावी साताऱ्याला गेले होते. त्यांनी तेथे ग्रामदेवाची पूजा केली होती. तसंच त्यांचे शेतात काम करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी सुट्टीवर असताना देखील आपण काम करत होतो, असं शिंदे यांनी सांगितलं होतं. तब्बल 65 फाईल्स आपण हातावेगळ्या केल्या असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं.

मोठी बातमी! ‘तुमचाही दाभोलकर होणार’; शरद पवारांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी

संजय राऊतांची टोलेबाजी

मुख्यमंत्री शिंदे यांच्या काश्मीर दौऱ्यावर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी टोलेबाजी केली आहे. राऊत म्हणाले, कुटुंबासह गेले असतील बर्फ पडत आहे. बर्फाची मजा काही वेगळीच असते. इकडे उन्हाळा आहे डोकं शांत करायला गेले असतील. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे स्फोट होणार आहेत. त्या संदर्भात अमित शहा यांनी त्यांना आदेश दिले आहेत.

मंत्रिमंडळ बदलाचे आणि काही मंत्र्यांना वगळण्याचे ते ओझं घेऊन ते काश्मीरला गेले असतील. भविष्यात जर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला तर, मिंधे गटाच्या चार प्रमुख मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना या अमित शहा यांनी परवाच्या भेटीत दिल्याची माहिती आहे. असं देखील राऊत म्हणाले आहेत.

Tags

follow us