Janasthan Award 2025 : साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या (Kusumagraj Foundation) वतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराची (Janasthan Award) नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा जनस्थान पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ नाटककार सतीश वसंत आळेकर (Satish Alekar) यांना जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी १० मार्च २०२५ रोजी या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे.
Jio Coin देणार का Bitcoin ला टक्कर? एका क्लीकवर जाणून घ्या कसा होणार फायदा
हा पुरस्कार १९९१ पासून दर वर्षाआड वर्षी मराठी साहित्यात अद्वितीय योगदान देणाऱ्या लेखकाला दिला जातो. या वर्षीच्या १८ व्या जनस्थान पुरस्कारासाठी पुरस्कार निवड समितीने सतीश आळेकर यांची एकमताने निवड केली. सोमवारी (२७) कुसुमाग्रज प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, कुसुमाग्रज फाउंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी यांनी ही घोषणा केली. रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार १० मार्च रोजी गुरुदक्षिणा सभागृहात आळेकरांना प्रदान केला जाणार आहे.
नाटककार सतीश आळेकरांना जनस्थान पुरस्कार जाहीर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानची घोषणा
सतीश आळेकर हे एक मराठी नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक आहेत. ते पुणे थिएटर अकादमीचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी महानिर्वाण (१९७४), महापूर (१९७५), अतिरेकी (१९९०), पिढीजात (२००३), मिकी अनी मेमसाहिब (१९७३) आणि बेगम बर्वे (१९७९) ही नाटके दिग्दर्शित केली आहेत. महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर यांच्यासोबत ते आधुनिक मराठी आणि भारतीय रंगभूमीतील सर्वात प्रभावशाली आणि प्रगतीशील नाटककारांपैकी एक मानले जातात. सतीश आळेकर यांनी ललित कला केंद्राचे संचालक म्हणून काम करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्य प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम केले.
दरम्यान, नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल आळेकरांना यापूर्वी अखिल भारतीय रंगभूमी परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार, तन्वीर सन्मान, नांदीकर पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, बलराज साहनी पुरस्कार यासह संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी सन्मानित कऱण्यात आलं.
यापूर्वी आशा बगे मधू मंगेश कर्णिक, वसंत आबाजी डहाके, डॉ.विजया राजाध्यक्ष, अरुण साधू, भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, ना.धों. महानोर, बाबूराव बागूल यांना जनस्थान पुरस्कारने सन्मानित करण्यात आलंय.